होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; डीए ३ टक्क्यानं वाढला

On: October 28, 2026 5:16 PM
Follow Us:
---Advertisement---

News Delhi: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत (डीआर) मध्ये तीन टक्के वाढीस मंजुरी दिली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या आर्थिक निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यासाठे एकूण १०,०१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक याचा केंद्राच्या घोषणाकडं लक्ष बाळगून होते अखेर ती घोषणा झाली असून डीए आणि डीआर मध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि सवलतीसाठी एकूण १०,०१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘डीए’ आणि ‘डीआर’मधील या वाढीचा फायदा १.१७ कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होईल. या निर्णयामुळे ४८.५४ लाख कर्मचारी आणि ६८.७१ लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होईल.

डीए ३ टक्के वाढीचा कर्मचाऱ्यांना किती फायदा?

मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामुळं कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यास मदत होईल. कर्मचाऱ्यांवरील वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी या भत्त्यात सुधारणा करते.

पगार आणि निवृत्तीवेतनात वाढ

केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वाढ होईल.

आर्थिक आधार: महागाईच्या दबावाखाली असताना, ही वाढ कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कौटुंबिक बजेटला बळकटी देईल.

एकूण १०,०१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानं तेवढा भार केंद्राच्या तिजोरीवर पडणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment