होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

On: November 2, 2026 3:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Nanded News: दुष्काळाच्या संकटामध्ये राज्य शासन बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. दिवाळीपूर्वी तातडीने पाच हजार रुपयांची मदत केली जात असून ही मदत अंतिम नाही. यानंतरही शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्यामुळे धीर सोडू नका, काळजी करू नका. कोणत्याही परिस्थितीत टोकाचा विचार मनात आणू नका, आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच या संकटकाळात शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नांदेड जिल्ह्यातील वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम-कोहळीकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, आमदार भिमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, महापौर कविता मुळे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

शासन बळीराजाच्या पाठीशी

दुष्काळामुळे आज शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे, या संकट काळात संपूर्ण राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या संकटाची दाहकता ओळखून राज्य शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विविध सवलती लागू केल्या. यापुढेही शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

५०० खाटांची सुसज्ज इमारत उभारणार

नांदेडची भूमी ही शेतकरी, कष्टकऱ्यांची भूमी आहे. आज वाडी बु. येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासह विविध विकास कामांचे लोकार्पण झाले आहे. आजपासूनच हे उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत कार्यरत होत आहे. तसेच या सुसज्ज इमारतीतीत सिटी स्कॅन आणि डायलिसिस सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्वस्त दरात उपलब्ध होतील. यासोबतच आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी ५०० खाटांची सुसज्ज इमारत उभारली जाणार असून त्याचे भूमिपूजनही लवकरच केले जाईल, असे सांगून लोकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले. तसेच नांदेडच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेडला कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध करणार: डॉ. आबिटकर

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सिटी स्कॅन, डायलिसिस सुविधा आणि वाढीव खाटांची मागणी तातडीने मंजूर करण्यात येईल. तसेच याठिकाणी मेंदूविकार, हृदयरोग यासारख्या विशेष तज्ज्ञ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच टाटा मेमोरियल ट्रस्टच्या सहाय्याने ‘महा केअर’च्या माध्यमातून नांदेड येथे कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मोफत अथवा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. आजपासून सुरू झालेल्या आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून थेट लोकांपर्यत पोहचून आरोग्य सेवांबाबत माहिती देण्यात येत असून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येत आहेत, असे सांगून दुष्काळामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जावूया परिस्थितीवर मात करू या, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

वाढीव आरोग्य सुविधा उपलब्ध होणार: खा. अशोकराव चव्हाण

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की, आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून ५०० खाटांची श्री गुरुगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयाची सुसज्ज इमारत होणार आहे. यासोबतच वाडी बु. उपजिल्हा रुग्णालयामुळे वाढीव आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. नांदेड शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेता हे उपजिल्हा रुग्णालय उपयुक्त ठरणार आहे. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातूनही विविध आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. आता नांदेडमध्ये कर्करोग उपचारांची सुविधाही लवकरच सुरु होणार आहे, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे नांदेडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नांदेड येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केंद्र शासनाकडे निधी मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयामुळे चांगल्या आरोग्य सेवा

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी नांदेड उत्तर मतदारसंघासह पूर्णा, वसमत तालुक्यातील रुग्णांना वाडी बु. उपजिल्हा रुग्णालयामुळे चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध होतील असे सांगितले. तसेच या रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ, ऑक्सिजन प्लांट मंजूर करण्याची विनंती यावेळी केली.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच मतदारसंघात रस्ते, पायाभूत सुविधांची विविध कामे सुरू आहेत. या कामांचेही लवकरच लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा वाटप, टँकरद्वारे पाणी पुरवठा उपक्रमाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या मदतीचे धनादेश, एकल महिलांना शिलाई मशीन, विद्यार्थिनींना सायकलचे वितरणही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. दुष्काळी परिस्थितीमुळे सत्कार, स्वागत समारंभ टाळून थेट कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकात आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच या उपक्रमांचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयाला मिळणार नवीन इमारत; ताथवडेतील जमिनीच्या सातबाऱ्याचं हस्तांतरण

जळगावच्या किमान तापमानात घट; उकाड्यापासून दिलासा

जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात ‘कैलाश वाद्यम्’ सादर; भंडाऱ्याच्या सोनेरी रंगात नटले ‘आदियोगी’

जळगावमध्ये ऊन, ढगाळ वातावरण अन् उकाडा; राज्यातील ‘या’ ८ जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा अलर्ट

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती: ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची मुलाखत अन् अध्यापन कौशल्य प्रक्रिया

Pan Masala Advertisement Case: पान-मसाल्याच्या जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा दणका! कायदेशीर कारवाई थांबवणार नसल्याचा दिला इशारा

Leave a Comment