Latest Weather News: शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी जळगावमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. एक-दोन वेळा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील. तसेच उद्या दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज आहे.जळगावचं आजचं तापमान हे ३५ अंशांवर होतं. उद्या तेवढेचं राहणार आहे. आज किमान पारा हा १६ अंशावर आहे. उद्या त्यात आणखी घट होऊन किमान तापमान १४ अंशावर घसरेल. त्यामुळं वातावरणातील उकाडा कमी होऊन नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आर्द्रता ७६ वरून ६५ टक्क्यांवर
जळगावची आर्द्रता ७६ वरून ६५ टक्क्यांवर आली आहे. सध्या अर्नब चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दिसून येत आहे. विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचा परिणाम देखील दिसून येत आहे. तापमान अचानक घसरलं असून थंडीची चाहूल लागली आहे. जळगावमध्ये मुसळधार पावसाचा इशारा नसला तरी नंदुरबार, धुळं, आणि नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नंदुरबार- धुळ्याला मुसळधार पावसाचा अलर्ट
कोकण व गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील आज या १२ ठिकाणांना घाटमाथ्यासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. त्यात रायगड, रत्नागिरी धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा, पुणे घाट, सातारा घाट, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर यांचा समावेश आहे.
उद्या ४ जिल्ह्यांना येलो अलर्ट
३० ऑक्टोबराला रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, नाशिक, नाशिक घाट परिसरासह ४ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हा ४० ते ५० किमी प्रति तास वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये हलक्या सरी बरसणार आहे.
४० ते ५० किमी प्रतितास वारं वाहणार
३१ ऑक्टोबरला कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हा ४० ते ५० किमी प्रति तास वाहण्याची दाट शक्यता आहे. ३१ ऑक्टोबर २ नोव्हेंबरपर्यंत हवामान विभागाचा कोणताही इशारा नाही.








