Indian Railway: मध्य रेल्वेतर्फे आगामी दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे ते दानापूर दरम्यान विशेष गाड्यांचे संचालन करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय तसेच अतिरिक्त प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने या विशेष गाड्या चालविण्यात येणार असून या गाड्यांचा जळगाव आणि भुसावळच्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
विशेष गाड्यांचा तपशील
पुणे ते दानापूर विशेष गाडी (१८ फेरी)
दरम्यान, पुणे ते दानापूर या गाडीला १८ फेऱ्या देण्यात आल्या आहेत. ०१४४१ विशेष गाडी दिनांक ०१ ते १३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रोजी पुणे येथून १९:४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दानापूर येथे ०७:०० वाजता पोहचेल. तर, ०१४४२ विशेष गाडी दिनांक ०३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार रोजी दानापूर येथून ०८:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हडपसर येथे १७:३५ वाजता पोहचेल.
गाडीला जळगाव आणि भुसावळलाही थांबे
गाडीला हडपसर (केवळ गाडी क्र. ०१४४१ साठी), दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगांव, मनमाड, जळगांव, भुसावळ, इटारसी, पिपरिया,नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन द्याल उपाध्याय, बक्सर, आरा. असे थांबे देण्यात आले आहे. तसेच गाडीची कोच संरचना ६ शयनयान, १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी आहे.

या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह आरक्षण दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) तिकीट काउंटरवर तसेच (IRCTC) च्या अधिकृत (www.irctc.co.in) या संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा देखील वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळेसाठी (NTES) भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.










