Multi Commodity Exchange Rate: शुक्रवारी वायदा बाजारात चांदीच्या किमतीत ४,१५३ रुपयांची घसरण होऊन ती प्रति किलो १,८५,३०० रुपयांवर आली. बाजारातील सहभागींनी आपली गुंतवणूक कमी केल्यामुळे ही घसरण दिसून आली. तर सोन्याच्या किमतीत ०.६७ टक्क्याची घसरण झाली आहे. वायदे बाजारात सोन्याची किंमत १,४१,६३७ रुपये झाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX), डिसेंबर डिलिव्हरीसाठीच्या चांदीच्या करारांमध्ये ४,१५३ रुपयांची (२.१९ टक्के) घसरण झाली आणि भाव १,८५,३०० रुपये प्रति किलोवर पोहोचले. या व्यवहारांत एकूण ३,९४४ लॉट्सची उलाढाल झाली.

विश्लेषकांच्या मते, बाजारातील सहभागींकडून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे चांदीच्या किमतींवर दबाव निर्माण झाला. तर सोन्याच्या किमतीत ०.६७ टक्क्याची घसरण झाली आहे. वायदे बाजारात सोन्याची किंमत १,४१,६३७ रुपये झाला आहे.











