होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Vande Bharat Train: प्रवाशांनो लक्ष द्या! 1 नोव्हेंबरपासून धावणार मुंबई- बंगळुरू- मुंबई स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस

On: October 31, 2026 4:34 PM
Follow Us:
---Advertisement---

Vande Bharat Train: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस संदर्भात ही बातमी आहे. 1 नोव्हेंबर 2026 पासून मुंबई- बंगळुरू- मुंबई स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. एसएमव्ही बंगळुरू स्थानकावर आयोजित कार्यक्रमात बंगळुरू – मुंबई स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून या ट्रेनला सुरुवात होईल. ही ट्रेन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून सुटणारी किंवा तिथे पोहोचणारी पहिली ‘स्लीपर वंदे भारत’ ट्रेन असेल. ही ट्रेन आंध्र प्रदेश राज्यातूनही प्रवास करेल.

‘हावडा – कामाख्या – हावडा स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक 27575/गाडी क्रमांक 27576) नंतर, देशातील ही दुसरी ‘स्लीपर वंदे भारत’ ट्रेन ठरेल. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील प्रमुख शहरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन रात्रीच्या प्रवासाचा एक नवीन पर्याय उपलब्ध करून देईल.

उद्घाटन सेवेचा तपशील

गाडी क्रमांक 06503 बंगळुरू – मुंबई स्लीपर वंदे भारत ट्रेनला 1 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12:15 वाजता एसएमव्ही बंगळुरू स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी 06:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

उद्घाटन विशेष गाडी क्रमांक 06503 चे थांबे: हिंदूपुर, धर्मावरम, अनंतपुर, गुंतकल, रायचूर, कृष्णा, यादगीर, कलबुरगि, सोलापूर, पुणे आणि कल्याण.

नियमित सेवेचा तपशील खालीलप्रमाणे

ही गाडी क्रमांक 27651 / 27652 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – एसएमव्ही बंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येईल आणि तिची नियमित सेवा 2 नोव्हेंबर 2026 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुरू होईल.

गाडी क्रमांक 27651 स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस 2 नोव्हेंबर 2026 पासून आठवड्यातून 6 दिवस (मंगळवार वगळता) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 20:10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:00 वाजता एसएमव्ही बंगळुरू येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 27652 स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस 3 नोव्हेंबर 2026 पासून आठवड्यातून 6 दिवस (सोमवार वगळता) एसएमव्ही बंगळुरू येथून 19:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे – कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, यादगीर, रायचूर, गुंतकल आणि अनंतपुर.

संरचना: 1 वातानुकूलित प्रथम, 4 वातानुकूलित द्वितीय आणि 11 वातानुकूलित तृतीय डबे.

आरक्षण: ‘स्लीपर वंदे भारत’ गाडी क्रमांक 27651 साठी आरक्षण 1 नोव्हेंबर 2026 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होईल.

स्लीपर वंदे भारत ट्रेनची विशेष वैशिष्ट्ये

• रात्रीच्या प्रवासात आरामासाठी सोयीस्कर स्लीपिंग बर्थ.
• उपकरणे चार्ज करण्यासाठी फोन-चार्जिंग पॉइंट्स.
• सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा.
• स्वयंचलित दरवाजे.
• शारीरिकदृष्ट्या अक्षम किंवा मर्यादित हालचाल असलेल्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा.
• गरज पडल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आपत्कालीन बटणे आणि ‘टॉकबॅक’ प्रणाली.

या सुविधा विविध वयोगटांतील आणि गरजा असलेल्या प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुखद आणि सोयीस्कर बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment