होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

रेल्वेने प्रवास करताय? मग, आता प्रवाश्यांसाठी ‘ऐच्छिक प्रवास विमा’ सुविधा उपलब्ध

On: October 27, 2026 6:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Indian Railway: भारतीय रेल्वेनं २७ ऑक्टोबर २०२६ पासून, प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्रांवरून आरक्षित तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘ऐच्छिक प्रवास विमा योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा, जी सध्या आयआरसीटीसी द्वारे ई-तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे, ती आता सर्व रेल्वे आरक्षण केंद्रांवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांसाठीही उपलब्ध असेल. त्याअंतर्गत आता प्रवासी आरक्षण केंद्रांवर (पीआरएस) आरक्षित तिकीट बुक करताना १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण निवडू शकतील, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आलं आहे.

या योजनेअंतर्गत, प्रवासी आपला मोबाईल क्रमांक देऊन आणि केवळ डिजिटल पेमेंटद्वारे विम्याचे शुल्क (प्रीमियम) भरून स्वेच्छेने प्रवास विमा घेऊ शकतात. सध्याच्या योजनेनुसार, प्रति प्रवासी विम्याचे शुल्क ४५ पैसे इतके आहे.

या योजनेअंतर्गत मिळणारे विमा संरक्षण

रेल्वे अपघात किंवा अनुचित घटनेमुळे मृत्यू – १० लाख रुपये
कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व – १० लाख रुपये
कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व – ७.५ लाख रुपयांपर्यंत
दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च – २ लाख रुपयांपर्यंत
मृतदेह वाहतुकीचा खर्च – १०,००० रुपये

हे विमा संरक्षण, आयआरसीटीसी ई-तिकीट प्रवाशांसाठी लागू असलेल्या ‘ऐच्छिक प्रवास विमा योजने’च्या विद्यमान अटी व शर्तींनुसार असेल.
जे प्रवासी विमा घेण्याचा पर्याय निवडतील, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पॉलिसीचा तपशील मिळेल. आरक्षण केंद्रावरील कर्मचारी प्रवाशांना हा पर्याय निवडण्यास मदत करतील, तसेच विम्याचे शुल्क योग्यरित्या जमा करून प्रवाशांची माहिती नोंदवतील.

मध्य रेल्वे, आरक्षण केंद्रांवरून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना या ऐच्छिक विमा सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून अत्यंत अल्प शुल्कात उपलब्ध असलेली ही सुविधा रेल्वे प्रवासादरम्यान अतिरिक्त आर्थिक सुरक्षा प्रदान करते. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सोयीसुविधांसाठी आणि कल्याणासाठी विविध प्रवासी हिताचे उपक्रम राबवण्यास कटिबद्ध असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment