Jalgaon News: युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे तसेच शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत आयोजित मिनी मॅरेथॉन २०२६ स्पर्धा जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, भारत सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), फिट इंडिया चळवळ आणि खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून के.सी.ई. सोसायटीचे सहसचिव अॅड. प्रवीणचंद्र जंगले उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (SAI) असिस्टंट डायरेक्टर माधव कांबळे (कांदिवली ईस्ट, मुंबई) उपस्थित होते. तसेच श्री. स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे संस्थापक मनोज आत्माराम पाटील, MyBharat चे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चौरे, आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी के.सी.ई. सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भालचंद्र प्रभाकर पाटील व स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन आणि ओरियन सी.बी.एस.ई. स्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा कंची आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी नशामुक्त भारत अभियानाची सामूहिक शपथ घेतली. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मिनी मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धेत शालेय गटासाठी ५ किलोमीटर आणि खुल्या गटासाठी १० किलोमीटर असे दोन अंतर निश्चित करण्यात आले होते. शालेय गटाची सुरुवात एम. जे. कॉलेज येथून होऊन काव्यरत्नांजली चौक, महाबळ चौक, संत गाडगेबाबा चौक व तेथून पुन्हा एम. जे. कॉलेजपर्यंत करण्यात आली. खुल्या गटाची स्पर्धा एम. जे. कॉलेज, काव्यरत्नांजली चौक, महाबळ चौक, संत गाडगेबाबा चौक, पैलवानबाबा दर्गा व तेथून पुन्हा एम. जे. कॉलेज अशा मार्गावर पार पडली. धावपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत व्यसनमुक्ती आणि आरोग्याचा संदेश दिला. तसेच व्यसनमुक्तीचा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात शालेय व खुल्या गटातील मुलगे-मुली आणि पुरुष-महिला अशा विभागांतील प्रथम ते सहावा क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुलांचा शालेय गट (१३ ते १६ वर्षे )
प्रथम – कार्तिक दीपक हटकर
द्वितीय – कुणाल बाळू महाले
तृतीय – नैतिक पद्माकर चव्हाण
चौथा – साहिल आत्माराम सुरळकर
पाचवा – सिद्धेश गोपाल धिवर
सहावा – प्रणव अनिल कवाडकर
मुलींचा शालेय गट
प्रथम – सेजल कमलाकर मोरे
द्वितीय – तेजस्विनी ताराचंद ढाके
तृतीय – गायत्री ज्ञानेश्वर पाटील
चौथा – धनश्री सोमनाथ चाटे
पाचवा – सयाली गुलाबचंद मेंढेकर
सहावा – गायत्री गणेश भोर
पुरुष खुला गट (१७ वर्षे व त्यावरील)
प्रथम – अजय तल्लिम तडवी
द्वितीय – योगेश प्रवीण पाटील
तृतीय – अजय आपसिंग वसावे
चौथा – नदीम यासीन तडवी
पाचवा – अक्षय निमसिंग गावित
सहावा – यश रमेश महाजन
महिला खुला गट
प्रथम – गायत्री योगेश सोनवणे
द्वितीय – गायत्री कृष्णा बोरसे
तृतीय – रोहिणी नरेंद्र बिर्हाडे
चौथा – जयश्री राजेंद्र पाटील
पाचवा – ईशा शिवविशाल मिश्रा
सहावा – प्रिया पद्माकर तायडे
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकलव्य क्रीडा संकुलातील डॉ. रणजीत पाटील, चंद्रलेखा जगताप, निलेश खडके, वसंत सोनवणे, योगेश चव्हाण, अंकुश तेली, पंकज बाविस्कर, अमोल गोमटे, योगेश महाजन, पंकज महाजन, सागर सोनवणे तसेच सर्व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रम एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून स्पर्धेची सांगता करण्यात आली.










