होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त वीर गुर्जर सेनेतर्फे नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह विविध कार्यक्रम

On: October 28, 2026 7:17 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: वीर गुर्जर सेनेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता शहरातील आकाशवाणी चौकाजवळील तापी पाटबंधारे शासकीय विश्रामगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.

वीर गुर्जर सेनेच्या कार्याचा आढावा

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर वीर गुर्जर सेनेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार असून, संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच न्याय निवाडा मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

समाजाच्या तक्रारींवर संवादातून तोडगा

समाजात वाढत असलेल्या विविध गैरप्रथा तसेच समाजबांधवांच्या अडचणी व तक्रारी यावरही कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार आहे. समाजबांधवांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात घेऊन याव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे. प्राप्त तक्रारींवर संवादाच्या माध्यमातून तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी न्याय निवाडा मंडळ कार्यरत राहणार आहे.

समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्यात येणार असल्याचे वीर गुर्जर सेनेतर्फे सांगण्यात आलं. त्यामुळं समाजातील बंधू-भगिनींनी आपल्या तक्रारी व समस्या घेऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं, असे आवाहन वीर गुर्जर सेनेतर्फे करण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

आयुष डॉक्टरांना उपलब्ध संधी अन् त्यांचं सामाजिक योगदान याविषयावर डॉ अशोक वार्ष्णेय यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

किनगाव प्रकरणी राष्ट्रीय हिंदू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी ५ नोव्हेंबरला १०० टक्के सामूहिक रजेवर! राज्यातील ३४ हजार कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

सिंहस्थ कुंभपर्वातून सामाजिक ऐक्याचा जागर; गोदावरीच्या महाआरतीत सहभागी झाल्याचा विशेष आनंद- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारतीय चलनी नोटांवर सरदार पटेल यांचे छायाचित्र छापा! शेतकरीपुत्र वसंत कोलते यांची पंतप्रधानांकडे मागणी

देशाच्या एकतेचा भक्कम पाया सरदार वल्लभभाई पटेल यांनी रचला: अमोल कोल्हे

Leave a Comment