होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रिंप्री- नांदरखे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा, शेतकऱ्यांशी साधला संवाद

On: October 29, 2026 4:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Nandurbar News: पावसानं ओढ दिल्यानं जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभं आहे. दुष्काळी परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध असून, त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं .

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, नुकसानीची व्याप्ती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी बंडू कापसे, तहसीलदार संतोष ढेरे आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनानं विविध निर्णय घेतले आहेत.

जिल्ह्यात कमी पावसामुळं पिकांचे नुकसान झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी असून, त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

आयुष डॉक्टरांना उपलब्ध संधी अन् त्यांचं सामाजिक योगदान याविषयावर डॉ अशोक वार्ष्णेय यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

किनगाव प्रकरणी राष्ट्रीय हिंदू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी ५ नोव्हेंबरला १०० टक्के सामूहिक रजेवर! राज्यातील ३४ हजार कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

सिंहस्थ कुंभपर्वातून सामाजिक ऐक्याचा जागर; गोदावरीच्या महाआरतीत सहभागी झाल्याचा विशेष आनंद- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारतीय चलनी नोटांवर सरदार पटेल यांचे छायाचित्र छापा! शेतकरीपुत्र वसंत कोलते यांची पंतप्रधानांकडे मागणी

देशाच्या एकतेचा भक्कम पाया सरदार वल्लभभाई पटेल यांनी रचला: अमोल कोल्हे

Leave a Comment