Jalgaon News: किमान तापमान आज १९.६ अंश सेल्सियस इतकं घटलं आहे. सोमवारी तापमान २०. ८ अंश सेल्सियस इतकं वाढलं होतं आता तापमानात उकाडा ही कमी झाला असूंन ७० टक्क्यावरून आर्द्रता (Humidity) ५८ टक्क्यावर घसरली आहे. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळं तापमान घसरल्यानं दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता.
राज्यातील पुढील तीन दिवसाचं हवामान
०३ आणि ०४ नोव्हेंबरला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा ४० ते ५० किमी प्रतितास वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच, विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा ३० ते ४० किमी प्रतितास वाहण्याची दाट शक्यता आहे. ५ नोव्हेंबरला मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामान निरभ्र आणि दाट राहण्याची शक्यता आहे. तसेच आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, नांदेड या ३ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान खात्यानं ५ व ६ नोव्हेंबर रोजी कोणताच इशारा दिला नाही. या दरम्यान मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामान निरभ्र आणि दाट राहण्याची शक्यता आहे.









