होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अर्णब चक्रीवादळानं आंध्र प्रदेशात हाहाकार; पाच जणांचा मृत्यू; ३.४५ लाख शेतकऱ्यांना बसला फटका

On: October 29, 2026 3:14 PM
Follow Us:
---Advertisement---

Andhra Pradesh: अर्णब चक्रीवादळानं आंध्र प्रदेशात हाहाकार माजवला आहे. बुधवारी पहाटे राज्याच्या किनारपट्टी भागातून आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळं पाच जणांचा मृत्यू झाला. तर, पिके व सार्वजनिक पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली. राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

१५ हजार विजेचे खांब उन्मळून पडले

मुख्यमंत्री नायडू यांनी बुधवारी संध्याकाळी राज्य सचिवालयातील रिअल टाइम गव्हर्नन्स सिस्टीम (RTGS) केंद्रावर परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, वादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, राज्यात सुमारे १५,००० विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. दरम्यान, हजारो हेक्टरवरील उभी पिकं पाण्याखाली गेली असून त्यांचं नुकसान झालं आहे.

वादळानं आता ओडिशामध्ये धडक दिली आहे, मात्र, त्याची तीव्रता कमी झाली आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी इशारा दिला आहे की, आंध्र प्रदेशात विध्वंस केल्यानंतर, चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेनं सरकत असल्यानं मलकानगिरीला आणखी फटका बसू शकतो. मुख्यमंत्री म्हणाले, “सरकार गंजम, गजपती, रायगडा, कोरापुट, मलकानगिरी आणि नबरंगपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करत आहे.”

किती लोकांचा मृत्यू झाला?

मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू विशाखापट्टणम जिल्ह्यात विजेचे खांब आणि झाडं कोसळून झाला. याव्यतिरिक्त, अनाकापल्ली आणि भीमावरम येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नायडू यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि १ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली. प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली.

२.२४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

चक्रीवादळ व त्यासोबत झालेल्या पावसामुळं कृषी क्षेत्राचंही मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ३.४५ लाख शेतकरी प्रभावित झालं आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील २,२४,४८९ हेक्टरवरील उभी पिके पाण्याखाली गेली असून मोठे नुकसान झालं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पिकं आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, भात पिकांसहित सुमारे ७०,९०० हेक्टरवरील कृषी आणि फळबाग पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे १०,४५० हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याचं किंवा त्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment