होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आयुष डॉक्टरांना उपलब्ध संधी अन् त्यांचं सामाजिक योगदान याविषयावर डॉ अशोक वार्ष्णेय यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

On: November 3, 2026 12:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील इंटर्न विद्यार्थ्यांच्या ओरिएंटेशन कार्यक्रमाप्रसंगी आरोग्यभारती संघटन सचिव डॉ अशोक कुमार वार्ष्णेय यांनी विद्यार्थ्यांना आयुष डॉक्टरांसाठी भविष्यातील संधीची उपलब्धता, बदलत्या काळात आयुष डॉक्टरांचं सामाजिक आरोग्यात योगदान या विषयावर मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संतोष चव्हाण, तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे सत्र अधिष्ठाता डॉक्टर पराग भागवत तसेच देवगिरी प्रांत संघटनेचे सचिव आप्पा कुलकर्णी यांचे ही मार्गदर्शन लाभले.

पारंपरिक वैद्यकीय उपचार पद्धतींला आयुष म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पारंपरिक आणि वैकल्पिक भारतीय वैद्यकीय पद्धतींचं (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) शिक्षण घेऊन त्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं योगदान महत्त्वाचं आहे. या पारंपरिक वैद्यकीय पद्धतीं आणि डॉक्टरांचं सामाजिक योगदान याबाबत विद्यार्थ्यांना मान्यवरांचं सखोल मार्गदर्शन लाभलं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळं आयुषमध्ये नव्यानं प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही आयुष्य भरासाठी ज्ञानाची शिदोरी ठरणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन डॉ प्रदीप ढवळे यांनी केलं. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ अविनाश जाधव, डॉ पांढरे, डॉ शरयू विसपुते, सौ राखी वाणी यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, तसेच वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment