होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भारतीय रेल्वेत देशभरात १,२६५ स्टेशन मास्तरांची भरती; असा करा अर्ज!

On: October 28, 2026 6:27 PM
Follow Us:
---Advertisement---

New Delhi: भारतीय रेल्वेनं केंद्रीकृत रोजगार सूचने अंतर्गत स्टेशन मास्टर पद भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू असून २५ नोव्हेंबर २०२६ रोजी अर्ज भरण्याची अंतिम मदत आहे. रेल्वेनं पदवीधर उमेदवारांसाठी रोजगाराची एक नवीन संधी खुली केली आहे. ही भरती पात्र उमेदवारांना भविष्यासाठी एक संधी असून आपल्या कार्यरत मनुष्यबळाला बळकट करण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

एका महत्त्वपूर्ण भरती निर्णयात, रेल्वे बोर्डानं स्पष्ट केलं की, २०२६ पासून स्टेशन मास्टर भरती स्वतंत्रपणे अधिसूचित केली जाईल. ही समर्पित भरती प्रक्रिया उमेदवारांना पदासाठी आवश्यक पात्रता, परीक्षा प्रक्रिया आणि रिक्त जागांची माहिती देईल.

दरम्यान, CEN 08/2026 अंतर्गत दिलेल्या (RRB) निहाय रिक्त पदांच्या माहितीनुसार, विविध रेल्वे भरती मंडळं आणि विभागांमध्ये एकूण १,२६५ रिक्त पदं आहेत. रेल्वेच्या विविध विभागांमध्ये जी रिक्त पदे आहेत. त्यासाठी पात्र पदवीधरांना देशाच्या विविध भागांतील पदांसाठी स्पर्धा करण्याची व सहभागी होण्याची चांगली संधी आहे.

असा करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज सुरू झाली असून ती २५ नोव्हेंबर २०२६ रोजी बंद होईल. उमेदवारांना आवाहन करण्यात येतं की, त्यांनी आपले अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर पात्रता अटी, रिक्त पदांचा तपशील आणि अर्ज करण्याच्या मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

उमेदवारांनी खालील अधिकृत लिंक्सद्वारे सविस्तर भरती सूचना, पात्रता निकष, परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज करण्याच्या मार्गदर्शक सूचना आणि आरआरबी-निहाय रिक्त पदांचा तपशील मिळवू शकतात:

रेल्वे भरती मंडळाची अधिकृत वेबसाइट:

https://rrb.indianrailways.gov.in/

ऑनलाइन अर्ज पोर्टल:

https://www.rrbapply.gov.in/

भरती-संबंधित अद्यतनं आणि सूचनांसाठी उमेदवारांनी आरआरबीच्या अधिकृत संपर्कांवर अवलंबून राहाव, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment