Gujarat News: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. दिवाळीच्या अगदी आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनासकांठा येथे १४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पीएम-किसान योजनेचा सुमारे १९,००० कोटी रुपयांचा २४ वा हप्ता देखील वितरित केला. याचा फायदा ९.३४ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी जून २०२६ मध्ये पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता वितरित केला होता. तर, आज पीएम किसान योजनेचा हा २४ वा हप्ता गुजरातच्या बनासकांठा येथून वितरित करण्यात आला
योजना काय
दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये ही योजना सुरू झाली. या पीएम-किसान योजनेअंतर्गत, आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना २३ हप्त्यांमध्ये ₹४.४७ लाख कोटींचं वाटप करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत, पात्र जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक ₹६,००० दिले जातात. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
पीएम-किसान योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळतो, ज्यांच्या जमिनीचा तपशील पीएम-किसान पोर्टलवर नोंदणीकृत आहे, ज्यांची बँक खाती त्यांच्या आधार कार्ड (UID कार्ड) शी जोडलेली आहेत आणि ज्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तुमचे नाव योजनेच्या अधिकृत लाभार्थी यादीत समाविष्ट आहे की नाही, हे तुम्ही पीएम-किसान वेबसाइटवर तपासू शकता.पीएम किसान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याचे थेट अपडेट्स आणि अधिक माहिती pmkisan.gov.in या पोर्टलवर मिळेल.









