होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भारतीय चलनी नोटांवर सरदार पटेल यांचे छायाचित्र छापा! शेतकरीपुत्र वसंत कोलते यांची पंतप्रधानांकडे मागणी

On: November 1, 2026 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या एकात्मतेच्या जडणघडणीत ऐतिहासिक योगदान देणारे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर असावे, अशी आग्रही मागणी शेतकरीपुत्र तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत कोलते यांनी केली आहे. राष्ट्रीय एकता दिन आणि सरदार पटेल यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी मांडली आहे.

‘देशाला कळू द्या! भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल!’ असा संदेश देत कोलते यांनी पंतप्रधानांना उद्देशून विनंती केली आहे की, भारतीय चलनी नोटांवर यापुढे सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात यावे. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषाचा गौरव चलनी नोटांच्या माध्यमातूनही व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताच्या उभारणीत ऐतिहासिक भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय देशातील प्रत्येक नागरिकाला व्हावा, तसेच भावी पिढ्यांनाही त्यांच्या योगदानाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही मागणी केल्याचे कोलते यांनी नमूद केले आहे.

देशभरात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा होत असताना सरदार पटेल यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक सन्मान व्हावा, ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर असावे, ही केवळ मागणी नसून राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे,’ अशी भूमिका जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते वसंत कोलते यांनी मांडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

आयुष डॉक्टरांना उपलब्ध संधी अन् त्यांचं सामाजिक योगदान याविषयावर डॉ अशोक वार्ष्णेय यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

किनगाव प्रकरणी राष्ट्रीय हिंदू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी ५ नोव्हेंबरला १०० टक्के सामूहिक रजेवर! राज्यातील ३४ हजार कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

सिंहस्थ कुंभपर्वातून सामाजिक ऐक्याचा जागर; गोदावरीच्या महाआरतीत सहभागी झाल्याचा विशेष आनंद- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशाच्या एकतेचा भक्कम पाया सरदार वल्लभभाई पटेल यांनी रचला: अमोल कोल्हे

Crime News: धक्कादायक! स्टेट बँकेवर भरदिवसा दरोडा, रोकडसह सोने लांबविले

Leave a Comment