होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावमध्ये ऊन, ढगाळ वातावरण अन् उकाडा; राज्यातील ‘या’ ८ जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा अलर्ट

On: November 2, 2026 5:26 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: जळगावमध्ये सकाळपासून कधी ऊन तर कधी पावसाचा खेळ सुरू होता. हवामान कोरडे होते, मात्र दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. जळगावचे कमाल तापमान सकाळी ३३.४ अंश सेल्सियस नोंदवलं गेलं आहे. तसेच वातावरणात उकाडा जाणवत आहे. आर्द्रता ७० टक्के इतकी नोंदवली गेली असून आजचे किमान तापमान २०.८ अंश सेल्सियस नोंदवलं गेलं आहे. तापमानात किंचित सी वाढ झाल्याचं दिसून येत असून उकडा कायम आहे. मात्र, ढगाळ हवामानानं काहीसा दिलासा दिला आहे.

उद्या ‘या’ ८ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

उद्या ३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या आठ जिल्ह्याना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर घाट, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ या कोल्हापूर घाटमाथा परिसरासह ५ जिल्ह्याना येलो अलर्ट दिला आहे.

राज्यातील या भागात पाऊस

२ ते ४ नोव्हेंबर दरम्यान त्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्र येलो अलर्ट दिला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस किंवा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे.२ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात येलो अलर्ट आहे. विदर्भात २ व ३ नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून वाऱ्याचा झोत ताशी ६० किमी पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.

इंदापूरमध्ये मुसळधार, १३ सेमी पाऊस

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे. १२ ते २१ सेंमी दरम्यान पावसानं हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र पुण्यातील इंदापुर येथे काल १३ सेमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, आज विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयाला मिळणार नवीन इमारत; ताथवडेतील जमिनीच्या सातबाऱ्याचं हस्तांतरण

जळगावच्या किमान तापमानात घट; उकाड्यापासून दिलासा

जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात ‘कैलाश वाद्यम्’ सादर; भंडाऱ्याच्या सोनेरी रंगात नटले ‘आदियोगी’

शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती: ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची मुलाखत अन् अध्यापन कौशल्य प्रक्रिया

Pan Masala Advertisement Case: पान-मसाल्याच्या जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा दणका! कायदेशीर कारवाई थांबवणार नसल्याचा दिला इशारा

Leave a Comment