होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती: ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची मुलाखत अन् अध्यापन कौशल्य प्रक्रिया

On: November 1, 2026 7:18 PM
Follow Us:
---Advertisement---

Pavitra Portal Shikshak Bharti: पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ अंतर्गत खासगी शैक्षणिक संस्थांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची २७ हजार १५४ प्राधान्यक्रमांवरील शिफारस समाविष्ट असलेली नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह आणि राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ . नंदकुमार बेडसे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.

मुलाखतीसह निवड प्रक्रियेसाठी खाजगी शैक्षणिक संस्थांच्या २ हजार ४१६ जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. पदनिहाय शिफारशींमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या १ हजार ६०९ रिक्त पदांसाठी ४ हजार ४७८, इयत्ता सहावी ते आठवीच्या ४ हजार ५०५ पदांसाठी १० हजार ७९२ आणि इयत्ता नववी ते दहावीच्या ४ हजार २१४ पदांसाठी ११ हजार ८८४ प्राधान्यक्रमांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही ऑनलाइन परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.

पवित्र पोर्टलवर १ मे ते २० जुलै २०२६ या कालावधीत मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारांतील जाहिराती प्राप्त झाल्या. पात्र उमेदवारांकडून ६ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आले. मुलाखतीसह निवड प्रकारात १ लाख ३१ हजार ५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम निश्चित केले होते.

मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील शिफारशींबाबत उमेदवार आणि संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. उमेदवारांना (https://tait2025.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावरील लॉगिनमध्ये निवडीची स्थिती पाहता येईल. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील ‘Download’ मेनूमध्ये उपलब्ध आहे.

शालेय शिक्षण विभागाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांना २ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरावर ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या तक्रारी विहित नमुन्यात (edupavitra2025grcc@gmail.com) या ई-मेलवर ७ नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment