होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Amnesty Scheme: वाहनचालकांना दिलासा! प्रलंबित दंडावर मिळणार 20 टक्क्यांपर्यंत सवलत

On: November 4, 2026 6:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Amnesty Scheme: राज्य सरकारने वाहनचालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियमभंगाच्या प्रलंबित दंडामुळे अडचणीत आलेल्या वाहनधारकांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. सरकारने थकीत ई-चलनाच्या दंडासाठी अभय योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक वाहनधारकांकडे ई- चलनांची थकबाकी आहे. दंडाची एकूण रक्कम मोठी झाली आहे. अशा परिस्थितीत थकीत दंड भरताना वाहनधारकांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने सरकारने अभय योजनेचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना 2026 असे असून प्रलंबित दंडाच्या रकमेवर 20 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. वाहनधारकांना या सवलतीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली चलनाची थकबाकी भरून वाहनधारकांना आपले वाहन दंडमुक्त करू शकतील.

या योजनेचा वाहनधारक आणि शासनाला देखील लाभ होणार आहे. यामुळे थकीत चलनांचा निपटारा करण्याची संधी वाहनधारकांना मिळणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारण्यात आलेला दंड वेळेत न भरल्यास त्याची थकबाकी वाढत जाते. त्यामुळे अनेक वाहनधारकांकडून दंड भरणे टाळले जाते किंवा तो पुढे ढकलला जातो. अशा वाहनधारकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.

मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असेल, कोणत्या प्रकारच्या चलनांना सवलत लागू होईल आणि योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार, याबाबतची सविस्तर माहिती सरकारकडून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment