होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! एससी ॲग्रोटेकच्या शेअर्समध्ये तेजी, 6 महिन्यांत नफ्यात तब्बल 48 पटीने वाढ

On: November 4, 2026 2:24 PM
Follow Us:
---Advertisement---

Shere Market News: गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीची संधी निर्माण झाली आहे. शेअर बाजारातील स्मॉल-कॅप श्रेणीतील कंपनी एससी ॲग्रोटेक लिमिटेडच्या शेअर्समध्ये सध्या तुफान तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या 7 ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरने तब्बल 37 टक्क्यांची दमदार उसळी घेतली आहे. 50 रुपयांपेक्षा कमी किमतीचा हा शेअर लागोपाठ अप्पर सर्किट मारत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीजवळ पोहोचला आहे.

7 दिवसांत 37 टक्के परतावा

23 ऑक्टोबर 2026 रोजी 30.88 रुपयांवर असलेला हा शेअर 3 नोव्हेंबर रोजी 42.26 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच अवघ्या काही दिवसांत या शेअरने 36.9 टक्के परतावा दिला. तो 43.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी किमतीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या तेजीसोबतच ट्रेडिंग व्हॉल्यूममध्येही प्रचंड वाढ झाली आहे; 27 ऑक्टोबरला अवघ्या 5,266 शेअर्सची झालेली खरेदी-विक्री 3 नोव्हेंबरला थेट 3.32 लाख शेअर्सवर पोहोचली आहे.

तिमाही नफ्यात 48 पटीने वाढ!

कंपनीच्या शेअर्समधील या तुफानी तेजीमागे तिचे जबरदस्त आर्थिक निकाल हे मुख्य कारण आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्सवरील महसूल 45.26 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत 5.02 कोटी रुपये होता.

कंपनीचा निव्वळ नफा 21.21 लाख रुपयांवरून थेट 10.21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच नफ्यात सुमारे 48 पटींची वाढ झाली आहे. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीने एकूण 83.11 कोटी रुपयांचा महसूल आणि 19.77कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

‘ॲग्रीब्रिज’ डिजिटल प्लॅटफॉर्मही लाँच

आर्थिक पुनरुज्जीवनासोबतच कंपनीने कृषी तंत्रज्ञान (Agri-Tech) क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीने 4 नोव्हेंबर 2026 पासून ‘ॲग्रीब्रिज'(AgriBridge- agribridge.app)हा डिजिटल कृषी प्लॅटफॉर्म सार्वजनिक वापरासाठी सुरू केला आहे. हा डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकरी, कृषी पुरवठादार आणि संस्थात्मक खरेदीदारांना एकाच छताखाली आणून पीक नोंदणी, खरेदीदार शोधणे आणि व्यवहारांची डिजिटल प्रक्रिया सुलभ करेल.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला

अप्पर सर्किट आणि कमी किमतीचे शेअर्स बाजारात चढ-उतार निर्माण करू शकतात. कंपनीने नोंदवलेला हा महसूल व नफा आगामी काळातही असाच शाश्वत ठेवला जातो का आणि ‘ॲग्रीब्रिज’ प्लॅटफॉर्मवरून प्रत्यक्षात किती उत्पन्न मिळते, हे पाहणे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment