Jalgaon News: आंतरराष्टीय स्तरावरील अनिश्चिता आणि सोन्याचे चढ- उतर होणारे दर यामुळं बाजारात संभ्रम दिसून आला, सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसात सातत्यानं घसरण होत असतांनाच धनतेरस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर आज पुन्हा वधारले आहे. साधारण २४ कॅरेट सोन्याचे दर हे ३२२० रुपयांनी वाढले आहे. जळगाव सोने बाजारात भाव वाढल्यानं सण उत्सवात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे.
सणासुदीचा काळ आणि सोन्याची वाढती मागणी लक्षात घेऊन सोन्याला झळाळी प्राप्त झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडी आणि देशांतर्गत मागणीत झालेली वाढ यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींना आधार मिळत आहे. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालेल्या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर डॉलर कमजोर झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. डॉलरमधील घसरणीचा फायदा सोन्याच्या पथ्यावर पडला असून नागरिक आणि गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याकडं वळाले आहे. तसेच कच्च्या तेलाच्या दरातील घसरण ही सोन्याला मजबूत करणारी ठरली आहे.
वायदे बाजारात सोने-चांदी दरवाढ
वायदे बाजारात देखील सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या किती १.२३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. येथे सोनेदर १,४४,९९९ रु. इतका आहे. तर चांदीचा दर देखील ०.५६ टक्क्यांनी वधारला आहे. वायदे बाजारात चांदी किलोला १८,८,७८६ रु. इतकी आहे. त्यामुळं वायदे बाजारात सोने-चांदी सारख्या मौल्यवान धातूंच्या किमती वधारल्या असल्याचं दिसून येत आहे.

जळगावतही सोन्याचे दर वधारले
जळगाव बाजारात गुड रिटर्न आणि ग्रो सारखं ऑनलाईन फ्लॅटफॉर्मद्वर देखल सोने- चांदीच्या दारात वाढ झाल्याचं दिसून येतं. २४ कॅरेट सोनं ( १० ग्रॅम) दर हा १,४६,६०२ इतका आहे. मजुरी आणि जीएसटीसह २४ कॅरेट सोनं १,६८,४४९ रु इटकर असून सोन्यात ३२२० रुपयाची वाढ झाल्याचं दिसत आहे. तर २२ कॅरेट सोने दरात २९५० रुपयांची वाढ झाली असून ते १,५४,४०९ रुपये झाले आहे. तर १८ कॅरेट सोने हे २.२६ टक्क्याची वाढ झाली असून १,२६,३४२ रुपये झाले आहे. १८ कॅरेट सोन्यात २४०० रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांचा खिशाला झळ देणारी आहे. तर जळगाव बाजारात चांदी किलोला २१०,००० रु. इतकी आहे. चांदीत १० हजाराची मोठी वाढ झाले आहे.











