होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

IND vs NZ 1st ODI : भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसामुळे ट्विस्ट, अखेर टीम इंडियाचा विजय

On: November 4, 2026 3:58 PM
Follow Us:
---Advertisement---

India beat New Zealand 1st ODI By 5 Wickets : टीम इंडियाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिका 3-2 ने जिंकल्यानंतर आता एकदिवसीय (ODI) मालिकेतही भारताने विजयाचा धडाका कायम ठेवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या किवी संघाला अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार यांच्या भेदक मारासमोर गुडघे टेकवे लागले, संपूर्ण न्यूझीलंडचा संघ 40.2 षटकांत अवघ्या 185 धावा करु शकता. दरम्यान, पावसाचा व्यत्यय या सामन्यात आला. तरी देखील भारतीय संघाने न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला.

भारतीय डावादरम्यान पावसामुळे दोन वेळा सामना थांबवावा लागला. पहिल्यांदा पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार भारताला 40 षटकांत विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र, सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर अवघ्या सात चेंडूंमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे भारताचे लक्ष्य बदलून 32 षटकांत 143 धावांचे करण्यात आले. भारतीय संघाने 22.4 षटकांत 5 गडी गमावून 144 धावा करत हा सामना सहज जिंकला.

दरम्यान, पहिले फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात आणि मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. टिम सेफर्टने सर्वाधिक 38 धावा केल्या. डॅरिल मिचेलने 28, तर ग्लेन फिलिप्सने 30 धावांचे योगदान दिले. याशिवाय विल यंग आणि हेन्री निकोल्स यांनी प्रत्येकी 9, टॉम लॅथमने 3, कर्णधार मिचेल सँटनरने 4, नॅथन स्मिथ आणि काईल जेमिसन यांनी प्रत्येकी 1 धाव केली.

एकेकाळी न्यूझीलंडची अवस्था 9 बाद 146 अशी झाली होती. त्यानंतर टिकनरने जेकब डफीच्या साथीने दहाव्या विकेटसाठी अवघ्या 31 चेंडूंमध्ये 39 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बाद होण्यापूर्वी टिकनरने 23 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 34 धावा ठोकल्या. गुरनूर ब्रारच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक राहुलने त्याचा झेल टिपला. डफी 15 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक चार विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. गुरनूर ब्रारने तीन, तर अंशुल कंबोजने दोन विकेट्स घेतल्याने न्यूझीलंडचा डाव 185 धावांवर संपुष्टात आला.

तर लक्षाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात रोहित शर्मा (0) बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 104 चेंडूंमध्ये 113 धावांची दमदार भागीदारी करत डाव सावरला. मात्र, 114 धावांवर गिलची विकेट पडली. त्याने 56 चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. गिल बाद झाल्यानंतर लगेचच विराट कोहलीही माघारी परतला. 124 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर फलंदाजीला आलेला अक्षर पटेल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 124 धावांवर 4 बाद अशी झाली.

पुढे 136 धावांवर श्रेयस अय्यर (15) बाद झाल्याने भारताची पाचवी विकेट पडली. मात्र, त्यानंतर केएल राहुल नाबाद 3 धावा तर नमन धीर याने नाबाद 5 धावा करत सहाव्या विकेटसाठी अवघ्या सहा चेंडूंमध्ये सात धावांची भागीदारी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताने 22.5 षटकांत 5 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या दिलीप गावीतने जिंकले सुवर्णपदक; दिलीप गावित कोण आहे? त्याविषयी जाणून घ्या

‘बीसीसीआय’ची मोठी घोषणा: निवड समितीच्या अध्यक्षपदी प्रज्ञान ओझा तर, समितीत रमेश पवार यांचा समावेश

Asian Games 2026: भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्यात भिडणार; ३ ऑक्टोबरला क्रिकेटचा महामुकाबला रंगणार!

बुद्धिबळ स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाचे खेळाडू चमकले; विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रसाद सोनवणे याची ४० व्या ज्यु. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या चार खेळाडूंची निवड; विवेकानंद महाविद्यालयातील या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव

Leave a Comment