होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगावमधून १२ खेळाडूंची निवड

On: November 5, 2026 11:51 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे सांगली येथे दि. १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा संघ सहभागी होणार असून, त्यासाठी जळगाव बॉक्सिंग असोसिएशनतर्फे दि. ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होतं.

या निवड चाचणी स्पर्धेतून महिला व पुरुष गटातील एकूण १२ खेळाडूंची जळगाव जिल्हा संघात निवड करण्यात आली. महिला गटातून ६५ ते ७० किलो वजन गटात आयुषी भोसले, ४५ ते ४८ किलो वजन गटात हर्षा सपकाळे, ५१ ते ५४ किलो वजन गटात संध्या मोरे, ५७ ते ६० किलो वजन गटात दिशा पाटील आणि ७० ते ७५ किलो वजन गटात श्रुती सोनावे यांची निवड झाली.

पुरुष गटातून ५० ते ५४ किलो वजन गटात प्रथमेश नरवाडे, ६५ ते ७० किलो वजन गटात गौरव बारसे, ७० ते ७५ किलो वजन गटात नागेश खरारे, ७० ते ८० किलो वजन गटात गौरव बहारे, ८० ते ८५ किलो वजन गटात आशुतोष गौतम, ८५ ते ९० किलो वजन गटात भावेश ठाकूर आणि ९१ किलोपेक्षा अधिक वजन गटात लोकेश देवकर यांची निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे, जळगाव जिल्हा संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये चमक दाखविणारे नागेश खरारे आणि दिशा पाटील यांचा समावेश असल्यानं संघाच्या कामगिरीबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.स्पर्धेत पंच म्हणून पावन शिरसाठ, संतोष सुरवाडे, अलिशानाज शेख, विनीत सुरवाडे, भूषण पाटील आणि जैयद पटेल यांनी काम पाहिले.

यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या युथ अँड एज ग्रुप कमिशनचे चेअरमन निलेश बाविस्कर, बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मोरे, उपाध्यक्ष धनराज कसाट, सचिव चुणीलाल गुप्ता, विशाल बाविस्कर, दीपक वाल्डे, डॉ. शरूख पिंजारी तसेच राष्ट्रीय बॉक्सर रोहित पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आगामी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगावचा संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

जळगाव-भुसावळ मार्गे नागपूरला विशेष रेल्वे गाड्या धावणार

आयुष डॉक्टरांना उपलब्ध संधी अन् त्यांचं सामाजिक योगदान याविषयावर डॉ अशोक वार्ष्णेय यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

किनगाव प्रकरणी राष्ट्रीय हिंदू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी ५ नोव्हेंबरला १०० टक्के सामूहिक रजेवर! राज्यातील ३४ हजार कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

सिंहस्थ कुंभपर्वातून सामाजिक ऐक्याचा जागर; गोदावरीच्या महाआरतीत सहभागी झाल्याचा विशेष आनंद- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारतीय चलनी नोटांवर सरदार पटेल यांचे छायाचित्र छापा! शेतकरीपुत्र वसंत कोलते यांची पंतप्रधानांकडे मागणी

Leave a Comment