होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगाव-भुसावळ मार्गे नागपूरला विशेष रेल्वे गाड्या धावणार

On: November 5, 2026 7:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal News: दिवाळी व छट सणाच्या कालावधीत रेल्वेला होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील एलटीटी-नागपुर दरम्यान नाशिकरोडमार्गे अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. सणाच्या काळात प्रवाशांची सोय तसेच अतिरिक्त प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने या गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यात चाळीसगावसह जळगाव, भुसावच्या प्रवाशांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.

एलएलटीवरून ६ नोव्हेंबरपासून विशेष गाडी

१) एलटीटी-नागपूर विशेष गाडीच्या ८ सेवा राहणार आहे. गाड़ी क्रमांक ०१०८३ ही विशेष गाडी ६, ८,११, १३ नोव्हेंबर या कालावधीत एलटीटी येथून १७:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे ०७:०० वाजता पोहचेल. या गाडी क्रमांक ०१०८३ ही विशेष गाडी ५, ७, १०, १२ नोव्हेंबर या कालावधीत नागपूर येथून १३:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला ०६:१५ वाजता पोहचेल. (४ सेवा)

गाडीला थांबे ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगांव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.तसेच डब्यांची रचना ही ४ वातानुकूलित व्दितीय श्रेणी, ८ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ शयनयान श्रेणी आणि २ सामान्य व्दितीय श्रेणी अशी राहणार आहे.

मुंबई सीएसटी-नागपुर विशेष गाडी (४ सेवा)

गाडी क्रमांक ०१०८५ विशेष गाडी ही ७ आणि ९ नोव्हेंबरला मुंबई सीएसटीहून १५:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे ०७:०० वाजता पोहचेल. (२ सेवा) तर, ०१०८६ विशेष गाडी ८ आणि १० नोव्हेंबरला नागपूर येथून १३:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला ०५:२५ वाजता पोहचेल. (२ सेवा)

गाडीला थांबे दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगांव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा असे असून डब्यांची रचना ही २ वातानुकूलित व्दितीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ४ शयनयान श्रेणी, २ सामान्य द्वितीय श्रेणी आणि १ सामान्य द्वितीय श्रेणीचा समावेश आहे.

आरक्षण सुरू

वरील विशेष गाडीसाठी आरक्षण ४ नोव्हेंबरला पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू झाले आहे. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा देखील वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळेसाठी NTES / भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी जळगावमधून १२ खेळाडूंची निवड

आयुष डॉक्टरांना उपलब्ध संधी अन् त्यांचं सामाजिक योगदान याविषयावर डॉ अशोक वार्ष्णेय यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

किनगाव प्रकरणी राष्ट्रीय हिंदू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी ५ नोव्हेंबरला १०० टक्के सामूहिक रजेवर! राज्यातील ३४ हजार कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

सिंहस्थ कुंभपर्वातून सामाजिक ऐक्याचा जागर; गोदावरीच्या महाआरतीत सहभागी झाल्याचा विशेष आनंद- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारतीय चलनी नोटांवर सरदार पटेल यांचे छायाचित्र छापा! शेतकरीपुत्र वसंत कोलते यांची पंतप्रधानांकडे मागणी

Leave a Comment