होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दिवाळीत गुंतवणूकदारांची चांदी! 50 रुपयांपेक्षा स्वस्त असणाऱ्या शेअरने दिला एका वर्षात 172 टक्के परतावा

On: November 6, 2026 1:32 PM
Follow Us:
---Advertisement---

Shere Market : स्मॉल-कॅप क्षेत्रातील ‘एससी ॲग्रोटेक लिमिटेड’या कृषी क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात दिवाळीच्या मुहूर्तावर तुफान तेजी दाखवली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 172.40 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी हा शेअर 46.58 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. 50 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या पेनी स्टॉकने आपल्या कामगिरीने संपूर्ण बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे.

10000 रुपयांचे झाले 27,240 रुपये!

एका वर्षापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने एससी ॲग्रोटेकमध्ये 10000 रुपये गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे 27,240 रुपये झाले असते. म्हणजे गुंतवणूकदारांना निव्वळ 17,240 रुपयांचा फायदा झाला आहे. गेल्या काही दिवसांतील तेजी इतकी जबरदस्त होती की, 23 ऑक्टोबर रोजी 30.88 रुपयांवर असणारा हा शेअर सलग ‘अप्पर सर्किट’मारत अवघ्या 8 ते 9 सत्रांमध्ये 51 टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीच्या शेअर्समधील या तुफानी तेजीमागे तिचे जबरदस्त आर्थिक निकाल हे मुख्य कारण आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्सवरील महसूल 45.26 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत 5.02 कोटी रुपये होता.

कंपनीचा निव्वळ नफा 21.21 लाख रुपयांवरून थेट 10.21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच नफ्यात सुमारे 48 पटींची वाढ झाली आहे. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीने एकूण 83.11 कोटी रुपयांचा महसूल आणि 19.77कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाची 13 नोव्हेंबर 2026 रोजी महत्त्वाची बैठक प्रस्तावित आहे, ज्यामध्ये खालील 3 मोठ्या कॉर्पोरेट ॲक्शन्सवर विचार केला जाऊ शकतो.
– 10:1 स्टॉक स्प्लिट: एका शेअरचे 10 तुकडे होण्याची शक्यता.
– 4:5 बोनस शेअर्स: दर 5 शेअर्समागे 4 मोफत बोनस शेअर्स मिळण्याची शक्यता.
– 100 टक्के लाभांश : 10 रुपये दर्शनी मूल्यावर 100 टक्के लाभांश देण्याचा विचार.

उदाहरणाने समजून घ्यायचे तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे 10000 शेअर्स असतील आणि 10:1 स्प्लिट झाले तर त्याचे 1,00,000 शेअर्स होतील. त्यानंतर 4:5 बोनस मिळाल्यास आणखी 80,000 शेअर्स मिळून एकूण 1,80,000 शेअर्स होऊ शकतात. मात्र, स्प्लिट आणि बोनसमुळे शेअर्सची संख्या 18 पटीने वाढली तरी शेअरची किंमत त्याच प्रमाणात कमी होते, ज्यामुळे पोर्टफोलिओचे एकूण मूल्य लगेच बदलत नाही, ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

‘ॲग्रीब्रिज’ची डिजीटल क्रांती

कंपनीने कृषी व्यापारात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी ‘AgriBridge’ हे डिजिटल व्यासपीठ 4 नोव्हेंबर रोजी सुरू केले आहे. या ॲपद्वारे शेतकरी, कृषी पुरवठादार आणि संस्थात्मक खरेदीदार थेट खरेदी-विक्री करू शकतील. याशिवाय कंपनीने ‘SC Careoasis Healthcare Private Limited’ नावाने नवीन हेल्थकेअर उपकंपनी स्थापन करून आरोग्य क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment