होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Chandra Gochar 2026: दिवाळीत चंद्राचे संक्रमण ठरणार ‘या’ 4 राशींसाठी शुभ! धनवर्षावसह करिअरलाही मिळणार नवी दिशा

On: November 6, 2026 2:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Chandra Gochar 2026: पंचांगानुसार, सध्या दिवाळीपर्व सुरु आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीच्या काळात चंद्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. या काळात ग्रहांचे होणारे संक्रमण हे शुभ-अशुभ फळ देतात. त्यानुसार, चंद्राचं संक्रमण 7 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी कन्या राशीतून तूळ राशीत होणार आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे काही राशींना लाभ होणार आहे. करिअरपासून ते कौटुंबिक जीवनापर्यंत शुभ घटना या काळात या राशींच्या लोकांना अनुभवयास मिळणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहे त्या नशीबवान राशी.

मेष रास
चंद्राचे हे संक्रमण मेष राशीच्या सातव्या चरणात होणार आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर हा काळ चांगला आहे. यासह या काळात विवाहाचे अनेक योग जुळून येतील. जोडीदाराबरोबर संसाराचा गोडवा अधिक वाढेल. तुमच्या वैवाहिक जीवनात आणि करिअरमध्ये स्थिरता पाहायला मिळेल.

कर्क रास
या राशीच्या चतुर्थ स्थानी चंद्राचं संक्रमण होणार आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. तूळ राशीत चंद्राच्या होणाऱ्या संक्रमणामुळे तुमच्यासाठी हा काळ फारसा आव्हानात्मक नसणार आहे. तुमच्या सुख शांतीत भरभराट होईल, घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच, तुमची एखाद्या मानसिक त्रासातून सुटका होईल. करिअरमध्ये प्रगतीचे चांगल्या संधी उपलब्ध होतील.

कन्या रास
चंद्राचं संक्रमण तुमच्या द्वितीय चरणात होणार आहे. तुमच्या व्यवसायाला चांगली चालना मिळेल. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या वाणीत गोडवा जाणवेल. रागावर नियंत्रण तुम्ही ठेवाल. समाजात मान-सन्मान वाढेल.

धनु रास
तुमच्या राशीनुसार, चंद्राचे हे संक्रमण अकराव्या चरणात होणार आहे. या कालावधीत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक आहे. नोकरीत पदोन्नतीत होईल.

(डिस्क्लेमर : सदरचा लेख केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. शौर्य मराठी कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment