होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Railway Corruption Case: रेल्वेतील लाचखोर अभियंता सीबीआयच्या जाळ्यात

On: November 7, 2026 5:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Railway Corruption Case: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मध्य प्रदेशच्या पश्चिम मध्य रेल्वेच्या ‘न्यू कटनी जंक्शन’ येथील वरिष्ठ विभाग अभियंत्याला (Senior Section Engineer) लाचखोरीच्या प्रकरणात शुक्रवारी अटक केली आहे. न्यायालयानं ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या करवाईमुळं रेल्वे विभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, सीबीआयने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित संशयित आरोपीविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. संशयित आरोपीच्या विरद्ध दिलेल्या तक्रारीनुसार, ‘न्यू कटनी जंक्शन’ येथील वरिष्ठ विभाग अभियंत्यानं तक्रारदाराकडे ३० कामगारांना कामावरून न काढण्याच्या बदल्यात, प्रति कामगार १,५०० रुपयांप्रमाणे एकूण ४५,००० रुपयांची लाच मागितली होती.

४५००० रु. लाच स्वीकारताना अटक

सीबीआयने सापळा रचून, कटनी (मध्य प्रदेश) येथे तक्रारदाराकडून ४५,००० रुपयांची लाच स्वीकारताना या वरिष्ठ विभाग अभियंत्याला रंगेहात पकडलं. आरोपीच्या निवासस्थानी आणि कार्यालयात झडती घेण्यात आली, ज्यातून काही आक्षेपार्ह कागदपत्रे आणि इतर संबंधित पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

आरोपी वरिष्ठ विभाग अभियंत्याला ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करून जबलपूर येथील सक्षम न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment