होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Latest Weather Update: जळगावचं तापमान घसरलं; पारा १४ अंशांवर, उकाडा मात्र कायम!

On: November 7, 2026 2:58 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather Update: जळगावमध्ये हवामान कोरडं आहे. किमान तापमान शुक्रवारी १९.६ अंश सेल्सियस होतं.तर, आज तापमानात मोठी घसरण होऊन शनिवारी किमान तापमान १४.० अंश सेल्सियसवर घसरलं. असं असलं तरी, वातावरणात दिवसभर उकाडा जाणवत आहे. जळगावमध्ये आर्द्रता ८२ टक्के असल्यानं दुपारी चांगलच ऊन पडत आहे. मात्र,रात्री आणि पहाटे काहीसा गारवा असल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. पुढील काही दिवस किमान तापमान १४ अंश सेल्सियसच्या आसपास राहिल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे.

हवामान कोरडे

संपूर्ण प्रदेशात हवामान कोरडे होते. किमान तापमानात मोठा बदल नाही. दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर गुजरात प्रदेश, कच्छ येथे ते सरासरीपेक्षा जास्त आहे आणि इतरत्र सामान्य आहे. जळगाव येथे नोंदवलेले १४.० अंश सेल्सिअस हे या प्रदेशातील सर्वात कमी किमान तापमान होते. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

राज्यात या ठिकाणी जोरदार वारे

उत्तर कोकणातील कर्जत रायगड येथे ३५ किमी प्रति तास, दक्षिण कोकण रत्नागिरीत ३० किमी प्रति तास, उत्तर मध्य महाराष्ट्रात भुगाव आणि पाषाण – पुणे २६ किमी प्रति तास, तर, महाबळेश्वर-सातारा ३५ किमी प्रति तास आणि मराठवाडा येथील परभणी ३९ किमी प्रति तास वेगानं वारं वाहणार आहे, असा इशारा मुंबई कुलाबा प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment