Jalgaon News: आंतराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळं गुंतवणूकदार सोन्याकडं वळाल्याचं दिसत आहे. दीपावली सणाच्या ऐन दोन दिवस अगोदर सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. लक्ष्मी पूजाच्या आदल्या दिवशीच सोन्याचा दरात वाढ नोंदवल्यानं जळगाव सोने बाजारात मागणी वाढल्याचं दिसत आहे. मात्र, सलग दोन दिवस दरवाढ झाल्यानं ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडला आहे. जळगाव बाजारात सोऱ्यांच्या दरात ८ टक्क्याची वृद्धी नोंदवली गेली आहे. तर चांदीच्या दारात घसरण दिसत आहे. चांदी किलोला २,०५, ००० रु. इतकी खाली असून ती -२.३८ टक्के इतकी घसरली आहे.
सोनं दरात ८ टक्क्याची वाढ
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,४३,५७० इतका असून त्यात ०.०८ टक्के वृद्धी झाली आहे. २२ कॅरेट १,३१,६१० इतका असून, त्यात ०.०८ टक्के तर, १८ कॅरेट सोन्याचा दर हा ₹१,०७,६८० इतका असून त्यात ०.०७ टक्के वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मेकिंग आणि जीएसटी सोडून हा दर आहे. जळगाव बाजारात जीएसटी आणि मेकिंग चार्जेस धरून २४ कॅरेट सोन्याचा दर १, ६५,६२२ (प्रति १० ग्रॅम) इतका तर, २२ कॅरेटचा दर १,५१,८१४ रु. तर, १८ कॅरेटला १,२४,२२० रु इतका भाव असून तो आठ टक्के वाढला आहे. नागरिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहक सोन्याला पसंती देत आहेत.

आंतराराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता
आंतरराष्ट्रीय बाजारापेठांमध्ये अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार अनेकदा सोन्याकडे एक सुरक्षित मालमत्ता बघतात आणि त्यात गुंतवणूक करतात, त्यातच वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहे, त्याचा परिणाम जळगावमधील दरांवरही होतोय. सध्याच्या अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम देखील होत असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.










