SSC And HSC Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रकं जाहीर झाली आहेत. मंडळाच्या पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कधी होतील ‘ते’ जाणून घ्या
बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारीत
दरम्यान, एचएससी आणि एसएससी मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर झाली आहे. त्यानुसार दहावी व बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्या आहे बारावीच्या (एचएससी) लेखी परीक्षेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहिती व वेळापत्रक मंडळाच्या (https://mahahsscboard.in/mr) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे मंडळाच्या सचिवांनी कळविलं आहे.

दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून
राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं असून बारावी बोर्ड परीक्षा 8 फेब्रुवारी 2027 ते 18 मार्च 2027 पर्यंत असणार
तर दहावी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून ते 15 मार्च 2027 दरम्यान चालणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक- तोंडी परीक्षा या 20 जानेवारी 2027 ते 6 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार असून .12 वी बोर्ड परीक्षा 28 जानेवारी 2027 ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार असल्याचं कळविण्यात आलं आहे.









