होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महानायक अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ

On: October 23, 2026 3:35 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि इतर अधिकाऱ्यांना एक धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. या ईमेलमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन आणि गायक दिलजीत दोसांझ यांचाही उल्लेख आहे. या ई-मेलमध्ये बिग बीं यांचा जलसा बंगला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझच्या २७ नोव्हेंबरच्या महालक्ष्मी येथे होणाऱ्या कॉन्सर्टमध्येही बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. डीसीपी मनीष कलवानिया यांनी सांगितले की, बीएमसीला एक धमकीचा ईमेल आल्याची पुष्टी दिली आहे.

प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर मुंबईत काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे बॉलिवूडला पुन्हा एकदा दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न झाला. हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गॅंगने घेतली होती. या प्रकरणी तिघांना अटक झाली. आज पुन्हा एकदा बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या जलसा बंगल्याचा मेलमध्ये उल्लेख असून तो बॉम्बने उडवून देण्याची धमंकी दिल्याने खळबळ उडाली. एवढेच नाही तर, अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ याचा ही कार्यक्रमाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळावी आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून या इमेलच्या धमकीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

धमकीच्या ईमेलमध्ये काय?

२३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३१ वाजता पाठवलेल्या ईमेलमध्ये, दुपारी ३:११ वाजता मुंबई महापौरांच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच, ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका शाळेवर ग्रेनेड हल्ला आणि २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकीही देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणांचाही उल्लेख आहे. या धमकीच्या ईमेलची चौकशी सुरू आहे.

डीसीपी मनीष कलवानिया यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. याशिवाय, दादरमधील शाळांनाही धमक्या देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Central Railway: खर्डी-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाचे यशस्वी कार्यान्वयन; ११७ किमी वेगाची गती चाचणी यशस्वी

Maharashtra Drought: पाणीटंचाईचे गावनिहाय कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करा – मंत्री गुलाबराव पाटील

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना केलं अभिवादन

बोरीवलीत सुमारे १० कोटी रुपये किमतीचे २ किलो हेरॉइन जप्त; तिघे अटकेत

दुर्दैवी घटना: गरबा खेळण्यासाठी आश्रमशाळेतून पाच विद्यार्थी पळाले अन् रस्ता अपघातात जीव गमावला

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

Leave a Comment