होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खान्देशच्या प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–देवळाली दरम्यान विशेष अनारक्षित मेमू धावणार

On: November 8, 2026 6:25 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal News: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भुसावळ आणि देवळाली दरम्यान विशेष मेमू अनारक्षित रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात खान्देशच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळं या मेमू गाडीनं ती दूर होणार आहे.

गाडीचा तपशील पुढील प्रमाणे

भुसावळ- देवळाली ही विशेष अनारक्षित मेमू गाडी १० आणि ११ नोव्हेंबरला भुसावळ येथून ०९:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी देवळाली येथे १३:०५ वाजता पोहचेल. देवळाली-भुसावळ ही विशेष अनारक्षित गाडी १० आणि ११ नोव्हेंबरला देवळाली कॅम्प येथून १३:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे १७:०० वाजता पोहचेल.

गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, नाशिक रोड आणि देवळाली हे थांबे देण्यात आले आहे. दिवाळी सणामुळं लांब पल्ल्याच्या गाडयांना गर्दी असल्यानं खान्देशच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अतिरिक्त गर्दी असल्यानं गाड्या भरून येत असून या काळात जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, आदी भागातील प्रवाशांना जागा मिळणं कठीण झालं आहे. या गाडीनं खान्देशवासियांची मोठी गैरसोय होत आहे. नव्या मेमूमुळं ही गैरसोय टळणार आहे.

कोच संरचना -१२ मेमू कार

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. या विशेष मेमू रेल्वेगाडीमुळे दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रित करण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment