होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मुंबई लोकलचा खोळंबा! ओव्हरहेड उपकरणांवर अज्ञात वस्तू अडल्यानं गाडयांना उशीर

On: October 26, 2026 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: ठाणे-मुलुंड दरम्यान डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. अज्ञात वस्तू अडकल्याने लोकल उशिरानं धावत आहेत. तसेच ठाणे-मुलुंड आणि कांजूरमार्ग-भांडुपदरम्यान सिग्नल यंत्रणेतही बिघाड झाल्यानं लोकलचा खोळंबा झाला. त्यामुळं प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या लोकल सेवांना फटका बसला असून दुरुस्तीचं काम सुरू आहे.

लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असून मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला सोमवारी तांत्रिक बिघाडांचा फटका बसला. त्यामुळं रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. ठाणे-मुलुंड दरम्यान डाऊन मार्गावरील ओव्हरहेड व्हायरमध्ये अज्ञात वस्तू अडकल्याने उपनगरीय लोकल गाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन गाड्या उशिराने धावत आहे. दरम्यान, गाड्या वेळापत्रकानुसार धावत नसल्याचं मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सकाळी सांगितलं. याशिवाय ठाणे-मुलुंड आणि कांजूरमार्ग-भांडुप स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाकडून सकाळी ११:५५ वाजता देण्यात आली.

ठाणे-मुलुंड दरम्यान ‘डाऊन’ (DN) लोकल मार्गावरील ओव्हरहेड उपकरणांवर (OHE) एखादी अज्ञात वस्तू अडकल्यामुळं, उपनगरीय रेल्वे सेवा विलंबाने धावत आहेत.अशी माहिती मध्य रेल्वेच्या डीआरएम मुंबई कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३३ वाजेच्या सुमारास ही माहिती सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून देण्यात आली आहे. या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केलं.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment