होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Paldhi Accident : महिनाभरही घेता आला नाही नव्या कारचा आनंद, आजोबा-नातवाला काळाने हेरले!

On: January 27, 2026 6:23 AM
Follow Us:
---Advertisement---

Paldhi Accident : महिन्याभरापूर्वी घेतलेल्या कारच्या लकी-ड्रॉची माहिती घेऊन परतणाऱ्या दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाळधीनजीक सावदे-रिंगणगाव फाट्यावर घडली. देशमुख चुनीलाल राठोड (वय 55 रा. निपाणी तांडा ता. एरंडोल) व त्यांचा नातू परेश दिनेश राठोड (वय 6 वर्ष) असे मृत दोघांचे नाव आहे.

निपाणी तांडा येथील देशमुख चुनीलाल राठोड (वय 55) हे नातू परेश दिनेश राठोड (वय 6 वर्ष) सोबत महिन्याभरापूर्वी घेतलेल्या कारच्या लकी-ड्रॉची माहिती घेऊन परतत होते.

दरम्यान, त्यांच्या दुचाकी क्रमांक (एम.एच 19 आर 1642) ला पाळधीनजीक सावदे-रिंगणगाव फाट्यावर भरधाव कंटेनर (एमएच 05 एम 3248) ने धडक दिल्याने आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला.

देशमुख राठोड यांनी आपल्या कुटुंबासाठी महिन्याभरापूर्वी नवीन कार खरेदी केली होती. मात्र, कुटुंबात नवीन कारचा आनंद असताना महिनाभरातच काळाने आजोबा-नातवाला हिरावून घेतलं.

घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबासह ग्रामस्थ ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. वडील व मुलगा गमावलेल्या दिनेश राठोड यांना दुःख अनावर झाले. दोघांचाही मृतदेह बघताच राठोड कुटुंबाने एकच आक्रोश केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

अमळनेरला गुडघा-खांदा आजारांवर तज्ज्ञ उपचारांची सुविधा; येत्या मंगळवारी प्रसिद्ध डॉ. पियुष वसईकर यांची सेवा उपलब्ध

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Leave a Comment