होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Agricultural Produce Market Committee Chopda : भाजीपाला-फळांचा लिलाव उद्यापासून बाजार समिती आवारात होणार!

On: January 31, 2026 10:30 AM
Follow Us:
---Advertisement---

Agricultural Produce Market Committee Chopda : चोपडा तालुक्यातील भाजीपाला लिलाव यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून हा निर्णय अमलात येणार शेतकऱ्यांना असून, अधिकृत बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या आर्थिक नुकसानीस आळा घालण्याचा उद्देश असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी दिली.

सभापती पाटील यांनी सांगितले की, तालुक्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत नगर परिषदेच्या आठवडे बाजार आवारात भाजीपाला व फळांचे लिलाव होत होते. मात्र आता दररोज होणारे भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा आदी सर्व कृषी उत्पादनांचे लिलाव बाजार समितीच्या आवारात पार पडणार आहेत.

शेतकरी बांधवांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिकृत बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच व्यवहार पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक व्यापारी व शेतकऱ्यांना अधिकृत परवाने दिले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सुविधा वाढविण्याचा निर्णय

बाजार समितीमार्फत शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात माल सुरक्षित ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मालाची आवक लक्षात घेऊन वाहन सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे व्यवहार अधिक सुकर व सुरक्षित होणार असल्याचे सभापती म्हणाले.

प्रशासनाशी समन्वय

या निर्णयासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, काही शेतकरी व व्यापाऱ्यांशी प्राथमिक बैठकही घेण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले. दरम्यान, १ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लिलावप्रक्रियेसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. तसेच काही अडचणी अथवा प्रश्न असल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापतींनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment