होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पत्रकारांच्या हक्कासाठी गर्जना : उद्या जळगावात निर्णायक बैठक, पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन

On: January 31, 2026 2:29 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव : पत्रकारांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आक्रमक संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’ची बैठक उद्या रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६) रोजी द्मालय शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस), जळगाव येथे दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, उपाध्यक्ष रविंद्र पवार, सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, सदस्य गणेश पाटील, सुनील चौधरी, जोशीला पगारिया आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

काय आहे बैठकीचा मुख्य उद्देश

ग्रामीण भागातील पत्रकारांची ‘वज्रमुठ’ अधिक मजबूत करण्यासाठी व त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र व जिल्हाध्यक्षांसह जिल्हास्तरीय नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

भविष्यातील ध्येयधोरणे होणार निश्चित

​पत्रकारिता क्षेत्रातील वाढती आव्हाने आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी संघटना सदैव तत्पर आहे. बैठकीत केवळ नूतन कार्यकारिणीची निवडच होणार नाही, तर संघटनेच्या भविष्यातील कार्याची दिशाही निश्चित केली जाणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment