होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash : काहीतरी गडबड…, विमान अपघातावर संजय राऊतांना शंका

On: February 2, 2026 7:41 PM
Follow Us:
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संजय राऊतांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, काहीतरी गडबड असल्याचे राऊतांनी म्हटले.

पडद्यामागे काहीतरी घडले असावे – संजय राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी कधीही भाजपच्या अजेंड्यावर काम केले नाही. सत्तेसाठी ते एकत्र आले. त्यांच्यावर भाजपने काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी, सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भाजपला सरेंडर झाले.

आपल्या वरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. पडद्यामागे काहीतरी घडले असावे. विमान अपघातात मृत्यू कसा झाला, याची चौकशी झाली पाहिजे.

अन् १० दिवसांतच त्यांचा मृत्यू – संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की अजितदादांनी “घरी परतायचेय” असे म्हटले होते. त्यानंतर भाजप सदस्यांनी त्यांना सिंचन घोटाळ्याच्या फायलींसह धमकावले. तथापि, त्यांनी त्याच सिंचन घोटाळ्याच्या फायलींसह उत्तर दिले, “मला विसरून जा, तुमच्या घोटाळ्याच्या फायली माझ्याकडे आहेत.” मात्र, १० दिवसांतच त्यांचा गूढ मृत्यू झाला. यावरून आपण काय समजून घ्यावे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment