Iranian Woman Case : जळगावच्या धरणगावात इराणी महिलेला आश्रय देणाऱ्या कुरेशी शेख रफीक शेख मुसा व शेख अहमद रजा शेख मुसा (दोघे रा. धरणगाव) या दोघांना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आश्रय देणाऱ्याचा ९० हजार पानांचा मोबाइल डेटा
यातील शेख अहमद हा आयुर्वेद, युनानी उपचार करणारा असून तो पाकिस्तानमधील काही क्रमांकाशी संपर्कात असल्याचे आढळून आल्याने त्याची सखोल चौकशी केली जात आहे. त्यासाठी पोलिसांनी मोबाईल डेटा काढला असता तब्बल ९० हजार पानांचा डाटा समोर आला आहे.
बेकायदेशीररित्या धरणगावत वास्तव्य केल्याप्रकरणी इराणी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या महिलेचा व्हिसा सन २०२२मध्ये संपलेलाअसताना तिला आश्रय दिल्याप्रकरणी कुरेशी शेख रफीक शेख मुसा व शेख अहमद रजा शेख मुसा या दोघांना अटक केले होते.
त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी (३ फेब्रुवारी) न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दोन हजार पानांचा डाटा काढला वेगळा
अटक केलेल्या दोघांपैकी शेख अहमद याच्या मोबाईलवरुन पाकिस्तानातील काही क्रमांकाचा संपर्क झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल डेटा काढला असता तब्बल ९० हजार पानांचा डेटा समोर आला. त्यातील संशयास्पद संपर्कासंदर्भात चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेने दोन हजार पाने वेगळी काढली असून त्यातून माहिती एकत्रिक केली जात आहे.
Iranian Woman : अखेर ‘त्या’ इराणी महिलेची भारतातून होणार हकालपट्टी








