होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Eye Care Tips: तुमच्या मुलांना कमी वयात चष्मा लागलाय? मग, दृष्टी वाढविण्यासाठी खाऊ घाला ‘ही’ फळं

On: February 16, 2026 3:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Eye Care Tips: हल्ली अनेकांना डोळ्यांचा त्रास होत आहे. काहींना तर लहान वयात चष्मा लागत आहे. लहान मुलांना चष्मा लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीराला पोषक जीवनसत्त्वाची कमतरता तसेच टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉपचा अतिवापर. यामुळे डोळ्यांवर जास्त ताण येत दृष्टीदोष निर्माण होत कमी वयात चष्मा लावण्याची वेळ मुलांवर येते. या समस्येत वैद्यकीय उपचारासह आहार, दैनंदिन जीवनशैली याकडे लक्ष दिल्यास लहान मुलांची डोळ्याची समस्या दूर होत त्यांचा चष्मा घलविता येवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांना कोणता पौष्टिक आहार दिल्यास डोळे निरोगी होत चष्मा लवकर निघायला मदत होते.

 

पपई

चवीला गोड आणि पोषकतत्वाने समृद्ध पपईचा आहारात समावेश केला पाहिजे. यात व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांसह संपूर्ण आरोग्यास याचा लाभ होतो. यामुळे डोळे निरोगी राहतात.

 

जरदाळू

जरदाळूमध्ये व्हिटॅमिन ‘ए’, पोटॅशियम, व्हिटॅमिन ‘सी’, बीटा कॅरोटीन आणि लायकोपिन हे पोषक तत्त्व असतात. त्यामुळे लहान मुलांना जरदाळू खाऊ घालणे फायद्याचे ठरते. जरदाळू हे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

 

संत्री

संत्रीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ मुबलक प्रमाणात असतं. संत्री खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरताही भरून निघते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास लाभ होतो.

 

भोपळा

डोळ्यांच्या आरोग्यासाठी भोपळा आणि भोपळ्याच्या बियांचे सेवन आरोग्यला फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन ‘ए’ असते. ज्यामुळे डोळे निरोगी राहतात आणि दृष्टीदोष कमी होतो.

 

गाजर

टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे लहान मुलांना डोळ्याची समस्या निर्माण होत आहे. टीव्ही, मोबाईल या सारख्या गोष्टींमुळे मुलांचा स्क्रीन टाईम देखील वाढला आहे. याचा सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होत कमी वयातच चष्मा लागतो. अशात डोळ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लहान मुलांच्या आहारात गाजराचा समावेश करावा. गाजरात ‘ए’ जीवनसत्त्व असते. गाजरचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होते.

डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

(आपल्या परिसरातील सामाजिकराजकीयशैक्षणिकक्रीडाधार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी डिजिटल शौर्य मराठीच्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)  

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment