होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Solar Energy: उद्योगांसाठी ‌‘ओपन ॲक्सेस‌’; 16 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट

On: February 17, 2026 12:16 PM
Follow Us:
---Advertisement---

Solar Energy: राज्यात आशियातील सर्वांत मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवला जात असून, या वर्षाअखेर 16 हजार मेगावॅट सौर ऊर्जा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‌‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन‌’च्या (मास्मा) वतीने आयोजित ‌‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो 2026‌’चे उद्घाटन त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले, त्या वेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज, उद्योगांना परवडणाऱ्या दरात वीज आणि लघुउद्योगांच्या ऊर्जाखर्चात बचत व्हावी, म्हणून सौर ऊर्जेचा विस्तार विकासाचा मूलाधार ठरत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.

फडणवीस म्हणाले, ‌‘सौर ऊर्जा ही केवळ पर्यावरणपूरकतेसाठीचा पर्याय राहिला नसून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची, ऊर्जा सुरक्षिततेची आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी ‌‘मास्टर की‌’ ठरली आहे. राज्य सरकारने सौर ऊर्जा धोरण, छतावरील सौर प्रोत्साहन योजना, पीएम सूर्यघर योजना, पीएम कुसूम योजना, सौर उद्याने, ऊर्जा साठवण प्रकल्प आणि ग्रीन एनर्जी कॉरिडॉर यांच्या माध्यमातून अक्षय ऊर्जेला गती दिली आहे.‌’

ऊर्जा स्वावलंबी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन, उद्योग, तंत्रज्ञान संस्था, संशोधन केंद्रे आणि शेतकरी यांचासमन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, ऊर्जा स्वावलंबी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन, उद्योग, तंत्रज्ञान संस्था, संशोधन केंद्रे आणि शेतकरी यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मासमासारख्या उद्योग संघटनांची भूमिका धोरणात्मक भागीदार म्हणून अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या उद्घाटन कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, नगरसेविका मंजुषा खेडेकर, स्वातंत्रवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर, जर्मन इंडो इनोवेशन कॉरिडोरचे संस्थापक उपेंद्र बर्वे, मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रदीप खाडे आणि माजी अध्यक्ष शशिकांत वाकडे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment