होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Rohit Pawar : अजित पावर विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांचा नवा दावा, कॅप्टनबद्दल केलं ‘हे’ मोठं विधान

On: February 21, 2026 2:26 PM
Follow Us:
---Advertisement---

Rohit Pawar :  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आजही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. अशात आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक दावे करत आरोप केलेत. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानुसार, अपघातातील विमानाची किंमत 35 कोटी होती, मात्र विमानाचा विमा 210 कोटींचा होता. तर पायलटचा विमा 50 कोटींचा होता.

यासह विमानाचा पायलट हा मानिसक तणावात होता का? त्याला 4 वर्ष नोकरी नव्हती, जेट ऐयरवेजमध्ये जेव्हा हे कपूर कामाला होते तेव्हा त्यांना महिन्याला 10-12 लाख पगार होता. अलीकडे कुठेही नोकरी न मिळाल्याने त्यांनी 3 ते 4 लाख महिन्याला पगारवर व्हीआरएस जॉईन केलं होतं. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होते, आर्थिक तणावात होते असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान?

अजितदादांचे अपघात हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा अरोपही रोहीत पावर यांनी केला आहे. तसेच व्हीएसआर कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. त्यामुळे अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे. तसेच राहुल गांधी यांनाही हा विषय आपल्या हाती घ्यावा आणि नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आम्हाला साथ द्यावी, अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.

भाजपावर केली शंका उपस्थित

दरम्यान, अकाउंटेबल, फ्लाईट सेफ्टी मॅनेजरची चौकशी झाली का? त्यांना अटक झाली का? या जबाबदार व्यक्ती आहेत. हि व्यक्तीचं मोठं प्रस्त आहे, म्हणून त्यांना वाचनावण्यात येतंय. यातील एका कंपनी अधिकाऱ्यांवर अत्याचाराचे आरोप आहेत. लायसन्स नसताना अनधिकृतपणे विमान चावण्यात येत होते. तर भाजपचे ट्रोल या पत्रकार परिषदेला ट्रोल करत आहेत. आम्हाला प्रश्न पडतो की भाजपच्या ट्रोलकडून इतका विरोध का? त्या ट्रोलला पैसे कोण देतंय? ते भाजपची बाजू मांडत असतात हे आम्हाला माहिती आहे. यांनी पूर्वी रोहित शेट्टींना ब्लॅकमेल केलं होतं. भाजपचे ट्रोल जर विरोध करतात तर मग या कटात भाजपही सहभागी आहे का? अशी शंका निर्माण होते. असेही रोहित पवार म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment