होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून खान्देशचा किंग सचिन कुमावत एलिमिनेट

On: February 23, 2026 1:45 PM
Follow Us:
---Advertisement---

Bigg Boss Marathi 6 Sachin Kumavat Eliminate: मनोरंजन विश्वात सध्या ‘बिग बॉस मराठी’चीच चर्चा आहे. ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन चांगलाच गाजत आहे. घरातील सदस्यांच्या कुरघोडी, वागणं, एकमेकांविरोधातली कट-कारस्थान सर्वच गोष्टी रंगू लागल्या आहे. हा सीझन चांगलाचा रंगत असताना एक मोठी घडामोड बिग बॉसच्या घरात झाली आहे. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घराला हलक्यात घेणं आणि संधीचं सोनं न करणं घरातील एका स्पर्धकाला महागात पडलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून सहाव्या आठवड्या कोण घराबाहेर जाणार? याची संपूर्ण आठवडाभर चर्चा सुरू होती. अशातच अखेर रविवारी भाऊच्या धक्क्यावर सर्वांनाच धक्का बसला. खान्देशचा किंग सचिन कुमावत घरातून एलिमिनेट झाला. या स्पर्धेत रोशन, रूचिता आणि सचिन हे तिघे डेंजर झोनमध्ये होते. या तिघांमधून सचिन कुमावतला घरचा रस्ता धरावा लागला आहे.

सहाव्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता असे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. या स्पर्धकांमधून तीन स्पर्धक डेंजर झोनमध्ये तर उर्वरित सहा स्पर्धक सेफ झोनमध्ये गेले. रोशन, रूचिता आणि सचिन हे तिघे डेंजर झोनमध्ये होते.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून सचिन कुमावत बाहेर गेल्यानंतर आता घरात 12 ते 13 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. अशातच आता आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री घरात होणार असल्याचं बोललं जात आहे. आधीच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या राखी सावंतनं घरातील सदस्यांच्या नाकी नऊ आणले आहेत.

अहिराणी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि खान्देशी किंग म्हणून नावारुपाला आलेला सचिन कुमावत बिग बॉसच्या घरात म्हणावा तितका रमला नाही, असं म्हटलं तरी चालेल. मूळचा साध्यासुध्या स्वभावाचा सचिन कुमावत बिग बॉसच्या घरात कट-कारस्थान रचण्यात आणि खेळ समजण्यात कुठेतरी कमी पडला, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. पण, घरातील चांगला माणूस अशी ओळख त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करण्यात मात्र सचिन कुमावत यशस्वी ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पाऊले चालती पंढरीची वाट… संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला पालखी करणार प्रस्थान

Jalgaon News: जळगाव विधान परिषद निवडणूक; अपक्ष उमेदवार महायुतीचे गणित बिघडवणार, 16 उमेदवार रिंगणात

गुटखा माफियांचे धाबे दणाणले, राज्यातील कारवाईत ‘इतक्या’ जणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे- पिंपरी चिंचवड दारू भेसळप्रकरणी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

Monsoon Rain El NINO: राज्यात यंदा कमी पाऊस, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

11th Admission: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार; विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज

Leave a Comment