होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन, ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’चा उपक्रम

On: February 23, 2026 6:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: थोर समाजसुधारक, स्वच्छता आणि सेवाभावाचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव जिल्ह्यात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले.

 

समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आपल्या कृतीतून समाजप्रबोधनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या कार्यालयात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या सेवाभावी आणि समाजजागृतीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “स्वच्छता, शिक्षण आणि माणुसकीचा संदेश देणारे गाडगे महाराजांचे विचार आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी आहेत,” असे त्यांनी सांगितले. संस्थापक महासचिव भगवान सोनार यांनी, गाडगे महाराजांच्या सामाजिक चळवळीची माहिती देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी यांनी आपल्या मनोगतात, संत गाडगे महाराजांनी समाजातील सर्व घटकांसाठी काम केले. त्याच प्रमाणे पत्रकारांनी देखील काम करावे, असे आवाहन केले.

या प्रसंगी संघटनेचे संस्थापक खजिनदार ललित खरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जळगाव तालुका सचिव योगेश सुने, जळगाव शहर उपाध्यक्ष निखिल मोरे, शहर सचिव योगेश चौधरी,  लालचंद अहिरे, विकास चव्हाण, मनोज जोगी, किशोर शिंपी, संतोष माळी आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

 

यावेळी समाजसेवा, स्वच्छता, सामाजिक सलोखा आणि जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प पत्रकारांनी केला. या उपक्रमामुळे पत्रकारांमध्ये सामाजिक जाणीव अधिक दृढ झाली असून, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या विचारांना उजाळा मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment