Rashmika mandanna Vijay Devarakonda wedding: दाक्षिणात्या सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना विवाहबंधनात अडकली आहे. तिने दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा सोबत सप्तपदी घेतली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. राजस्थानमधील ITC Mementos Udaipur येथे हा शाही विवाह सोहळा पार पडला. दोघे पारंपरिक तेलुगू रितीरिवाजांनुसार सकाळी 10.10 वाजता विवाहबंधनात अडकले. वरमाला समारंभादरम्यान दोघेही भावुक झाले होते. लग्नाआधी 24 फेब्रुवारी रोजी संगीत आणि हळद अशा प्री-वेडिंग समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.
उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत रश्मिका-विजय यांचीही भर पडली आहे. यापूर्वी कटरीना कैफ विकी कौशल तसेच कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही राजस्थानमध्ये लग्न केले होते. रश्मिका-विजयच्या शाही अशा या विवाह सोहळ्याला जवळचे मित्र, कुटुंबीय आणि काही निवडक मान्यवर उपस्थितीत होते. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि थरून भास्कर यांनीही उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. लग्नानंतर वधू-वरांच्या मित्रमंडळींनी बाहेर जमलेल्या माध्यम प्रतिनिधी आणि चाहत्यांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. सेलिब्रिटी फोटोग्राफर Viral Bhayani ने यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हैदराबादमध्ये होणार रिसेप्शन
उदयपूरमधील समारंभात काही निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत रश्मिका-विजयचा विवाह पार पडला असला तरी रिसेप्शना मात्र अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होणार आहे. 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये हे भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते.










