होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला अजितदादा पवार यांचे नाव द्या! आ. अनिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

On: February 27, 2026 12:14 PM
Follow Us:
---Advertisement---

Amalner News: निम्न तापी प्रकल्प पाडळसे (ता. अमळनेर) या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे. याबाबतचे विनंतीपत्र माजी मंत्री तथा आ. अनिल भाईदास पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तसेच जलसंपदामंत्री यांना दिले आहे.

सदर पत्रात म्हटले आहे की, निम्न तापी प्रकल्प पाडळसे, हा तापी नदीवरील अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यातील 43 हजार 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच 17.1 टी.एम.सी. पाणी अडविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाने शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी सुध्दा पाणी राखीव असल्याचे नियोजन आहे.

एवढा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठपुराव्याने मंत्रीमंडळ बैठकीत डिसेंबर, 2024 मध्ये 4 हजार 890 कोटी रुपये एवढी चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली. त्यानंतर शासनाने प्रकल्प केंद्रीय जलआयोग यांच्याकडे प्रकल्प मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर प्रकल्प केंद्रीय जलआयोगने इतर संबंधित विभागाच्या वैधानिक मान्यता प्राप्त झाल्या त्यात महत्वाचे म्हणजे राज्याचा हिस्सा देण्याची हमी अजितदादा पवार यांच्या मार्फत राज्य वित्त आयोग यांनी दिल्यानंतर सीडब्ल्यूसीने शिफारस करुन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे प्रकल्प पाठविण्यात आला.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विशेष अधिकार समितीची मान्यता घेऊन प्रकल्पाला प्रधानमंत्री वृषी सिंचाई योजनेत समाविष्ट करण्यात आला. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे जलपूजन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले होते. परंतु त्यांच्या पाठपुराव्याने हा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. आज दुर्दैवाने ते आपल्यात नसल्याने या प्रकल्पाला अजितदादा पवार निम्न तापी प्रकल्प पाडळसे अशा नावास मान्यता द्यावी, अशी विनंती आ. अनिल पाटील यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment