होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

स्थायी समिती सभापतीसाठी डॉ. चंद्रशेखर पाटील तर महिला बालकल्याणसाठी सिंधु कोल्हे यांचे अर्ज

On: February 27, 2026 12:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव शहर महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजा अर्ज दाखल करण्यात आले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या निवडीची आता केवळ औपचारिकता उरली आहे.

दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती सभापतीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नगरसेविका सिंधु विजय कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे सुपूर्द केले. अर्ज दाखल करताना महापालिकेतील राजकीय वातावरण उत्साहाचे होते. यावेळी भाजपतर्फे गटनेता प्रकाश बालानी, उपगटनेता नितीन बरडे, स्थायी समिती सदस्य दीपक सूर्यवंशी, विशाल भोळे, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके तसेच महिला बालकल्याण समिती सदस्य सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे, गायत्री राणे, शिवसेनातर्फे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे तसेच समिती सदस्य प्रतिभाताई देशमुख, डॉ. अमृता सोनवणे यांच्यासह नगरसेवक प्रवीण कोल्हे, पियुष कोल्हे उपस्थित होते.

दरम्यान, स्थायी समितीवर डॉ. चंद्रशेखर पाटील यांची वर्णी लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर महिला व बालकल्याण समितीचे नेतृत्व अनुभवी सिंधू कोल्हे यांच्याकडे गेल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीत उत्साह दिसून येत आहे. एकमेव अर्ज आल्याने आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

अमळनेरला गुडघा-खांदा आजारांवर तज्ज्ञ उपचारांची सुविधा; येत्या मंगळवारी प्रसिद्ध डॉ. पियुष वसईकर यांची सेवा उपलब्ध

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Leave a Comment