होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धक्कादायक ! इन्स्टाग्रामवरुन प्रेम जुळले, अकुलखेड्यात विवाहीत प्रेयसिवर गोळी झाडून प्रियकराची आत्महत्या

On: February 28, 2026 8:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Chopda Murder News: विवाहबाह्य अनैतिक संबंधाचा थरारक अंत झाल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील अकुलखेडे येथे प्रेम प्रकरणातून विवाहीत प्रेयेसीवर गावठी पिस्तूलातून गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. ऐवढ्यावरच मारेकरी प्रियकर थांबला नाही तर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. शाळेतून परत आलेल्या मुलीला दोघंही रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने घटना उघडकीस आली.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, अकुलखेडा येथील  विवाहिता अनिता जगदीश पाटील व तिचा प्रियकर देवा सुरेश धनगर हे दोघे अनिता पाटील यांच्या घरात रक्तबंबाड अवस्थेत त्याच्या घरात आढळून आले.  आज सकाळी साडेदहाच्या सुमारास विवाहितेची मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर तिने रक्तात माखलेले दोघे मृतदेह पाहून हंबर्डा फोडला आणि घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली.

 

घटनास्थळी मयत देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली. घटनेची माहिती मिळतातच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले. पुढील तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर सावळे हे करीत आहेत. दोघांच्या मृतदेहांना पोस्टमॉर्टमासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीने फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सोशल मीडियावर जुळले होते दोघांचे सुत

 

मयत अनिता जगदीश पाटील व देवा सुरेश धनगर यांचे सोशल मिडिया इंस्टाग्रामचा माध्यमातून प्रेमाचे सुत जुडले होते. परंतु, काही दिवसांपासून प्रेयसी अनिता ही देवा धनगर यांला वेळ देत नसल्याचा राग देवाच्या डोक्यात होता. या रागातून देवा धनगर याने अनिता पाटील यांच्या राहत्या घरी अकुलखेडा येथे जाऊन गावठी पिस्टलने अनिताच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली. आणि नंतर देवा धनगर याने स्वता:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment