होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Crime : जुना वाद; मेहरूणमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, 2 जखमी

On: March 4, 2026 1:04 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Crime News:  जळगाव शहरातील मेहरूण परिसरात धुलिवंदनाच्या दिवशी दोन गटात तुफान हाणामारी झाली. मेहरुण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून ही घटना घडली. त्यानंतर किरकोळ दगडफेक होत दोन जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये नगरसेवक सुनिल महाजन यांचे बंधू भरत महाजन यांचा समावेश असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेहरूण परिसरात धुलिवंदनाच्या दिवशी साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर किरकोळ दगडफेक देखील झाली. यात घराच्या गेटची तोडफोडही करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्याबाहेर दोन्ही गटातील नागरिकांचा जमाव जमल्याने दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन्ही गटांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, या घटनेत दगडफेक झाली नसून जुन्या वादातून किरकोळ वाद झाला. या वादात दोन जण जखमी झाले असून, त्यापैकी भाजपाचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आता परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment