Jalgaon Crime News: जळगाव तालुक्यातील एका भागातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत सोडण्याच्या बाहान्याने घेऊन जात एका 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे.
याबाबात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडीत अल्पवयीन विद्यार्थिनी जळगाव तालुक्यातील एका गावातील रहिवसी आहे. दरम्यान संशयित आरोपी संदीप बळीराम तायडे (रा. चिंचोली ता. जळगाव) याने 2 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास पीडीत मुलीशी गोडबोलून जवळीक साधली आणि तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले.
त्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेत सोडण्याच्या बहान्याने घरून घेवून नशिराबाद भुसावळ रोडकडे घेवून जात एका झोपडीत तिच्यावर अत्याचार केला. घडलेला हा प्रकार पीडीत विद्यार्थिनीने तिच्या पालकांना सांगितला. त्यानुसार पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्याने या प्रकरणी नराधम संदीप तायडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे. दरम्यान, अत्याचाराच्या या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून नराधमास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.










