Skin Care Tip: उन्हाळ्यात वाढत्या तापमाणात तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन आवश्यक मानले जाते. परंतु फक्त सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे संरक्षण करू शकते का? असा प्रश्न निर्माण होतो. उन्हामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशात त्वचेचे आरोग्य सांभाळण्यासाठी सनस्क्रीनशिवाय इतर उपाय देखील महत्त्वाचे ठरतात. आजचा आपला लेख या विषयावरच असून जाणून घेऊया उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्यावी किंवा स्किनकेअरसाठी कोणती दिनचर्या पाळली पाहिजे?
सध्या मार्च महिना सुरु आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागला आहे. उष्णतेचा दाह आता जास्त असल्याने तापमान हळूहळू वाढत आहे, आणि लोकांनी सनस्क्रीन लावायला सुरुवात केली आहे. पण सूर्यप्रकाशापूर्वी सनस्क्रीन लावणे पुरेसे आहे का? काही लोकांना वाटते की फक्त सनस्क्रीन लावल्याने त्यांच्या त्वचेचे कडक उन्हापासून संरक्षण होणार नाही. तर वाढत्या उष्णतेसह धूळ आणि प्रदूषण याचा ही आपल्या तत्वचेवर परिणाम होत असतो, जर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर पिगमेंटेशन, कोरडेपणा आणि अकाली सुरकुत्या यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
स्किनकेअर तज्ञांचा असा विश्वास आहे की, सूर्य किरणांपासून त्वचेचे सरंक्षण करणे तितकेच महत्वाचे आहे, तसेच सनस्क्रीन लावणे ही महत्त्वाचे आहे. तुमची त्वचा स्वच्छ, हायड्रेटेड म्हणजेच योग्यरित्या संरक्षित ठेवणे अर्थात उन्हाच्या झाल्यापासून बचाव करू शकतो. नुकसान शकते. उन्हात बाहेर पडण्यापूर्वी योग्य आणि सोपी स्किनकेअर दिनचर्या ठेवणे महत्त्वाचे आहे. जी त्वचेला सूर्याच्या किरणांपासून वाचवेल आणि शिवाय त्वचा चांगली आणि निरोगी, चमकदार ठेवण्यास मदत होईल. आता सनस्क्रीन सोडून इतर पर्याय बघूया.
त्वचा क्लींजिंग करा.
उन्हात जाण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे. चेहऱ्यावर तेल, आणि घाण असली की, स्किनकेअर उत्पादने योग्यरित्या काम करत नाही. बाहेर जाण्यापूर्वी तुमचा चेहरा फेस वॉश किंवा क्लींजरने स्वच्छ धुवा. यामुळे तुमची त्वचा चांगली राहून स्किनकेअर राखली जाईल.
मॉइश्चरायझरने हायड्रेट करा
उन्हाळ्यात मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे आहे, बरेच लोक ते लावणे टाळतात परंतु, कधी कधी ते अडचणीचे ठरू शकते. सूर्य किरण आणि ऊन्हाच्या झळा त्वचेची आर्द्रता कमी करतात. हलके, तेल नसलेले मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होतेच पण, कोरडेपणा टाळता येतो. मॉइश्चरायझरमुळे त्वचेवर संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
टोनरमुळे त्वचा संतुलित करा
तुमचा चेहरा स्वच्छ केल्यानंतर टोनर वापरणे महत्वाचे आहे. टोनर त्वचेच्या पीएच पातळीला संतुलित करते आणि उघड्या छिद्रांना घट्ट करते. ते हलके हायड्रेशन देखील देते, त्याने दिवसभर त्वचा ताजी आणि गुळगुळीत वाटते. कापसाच्या सहाय्याने किंवा हातांनी तुमच्या चेहऱ्यावर हलके टोनर लावा.
सनस्क्रीन शेवटी लावा
तुमच्या स्किनकेअर दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सनस्क्रीन. सूर्यप्रकाशाची पातळी लक्षात घेऊन अर्धा तास आधी सनस्क्रीन लावावे. ते चेहरा, मान, हाताला लावावे. सनस्क्रीन त्वचेची हानीकाराक किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करून त्वचेचे संरक्षण करते. आणि त्वचेची होणारी आग आणि पिग्मेंटेशन सारख्या समस्यांपासून आपली सुटका करते.
(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)











